AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्या बंगल्यात शिरलंय नाल्याचं पाणी? Video सर्वत्र व्हायरल

Mumbai Monsoon : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला पावसाने झोडपलं आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलं असून मुंबई जाम झाली आहे. याचा फटका फक्त सामान्य जनतेलाच नाही तर, सेलिब्रिटींना देखील बसला आहे. पावासामुळे नदी, नाले तुडुंब भरले आहेत, ज्यामुळे सेलिब्रिटींच्या घरामध्ये देखील पाणी भरलं आहे.

Fact Check : अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्या बंगल्यात शिरलंय नाल्याचं पाणी?  Video सर्वत्र व्हायरल
| Updated on: Jul 03, 2026 | 2:54 PM
Share

Mumbai Monsoon : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ज्यामुळे हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट तर, काही ठिकाणी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. एवढंच नाही तर, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा.. असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे तर, पावासामुळे नदी, नाले तुडुंब भरले आहेत. ज्यामुळे मुंबईचे रस्ते पाण्याखाली आहेत. या मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका फक्त सामान्य जनतेलाच नाही तर, सेलिब्रिटींना देखील बसत आहे. नदी, नाले तुडुंब भरल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यांवर आलं आहे. सामान्यांच्या घरात पाणी घुसलंच आहे, पण सेलिब्रिटींना देखील याचा फटका बसला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जनक’ बंगल्यात देखील पाणी भरलं आहे. तर अभिनेता अजय देवगण याच्या ‘शिवशक्ती’ बंगल्यात देखील पाणी भरत आहे… सेलिब्रिटींच्या बंगल्यात पाणी घुसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. एवढंच नाही तर, बिग बी आणि अजय देवगण यांच्या बंगल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. जेथे पाणी भारलेलं दिसत आहेत. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ गेल्या वर्षाचा आहे … असं देखील सांगितलं जात आहे.

एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने अमिताभ बच्चन यांच्या ‘जनक’ बंगल्याचा व्हिडीओ पोस्ट करत, सध्या त्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये बिग बींच्या बंगल्यात पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे… व्हिडीओ पोस्ट करत इन्फ्लुएन्सर ने कॅप्शनमध्ये, ‘मुसळधार पावसामुळे अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ”जनक ‘ बंगल्यात पाणी घुसल आहे…’, व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पावसाचे पाणी शिरले

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शूट करताना संबंधित इन्फ्लुएन्सर म्हणाला, “तुम्ही पाहू शकता की अमिताभ बच्चन यांच्या घरातही पाणी शिरलं आहे. संपूर्ण बंगला पाण्याने भरला आहे. आणि हे अमिताभ बच्चन यांचं दुसरं घर आहे. मुंबईत तुम्ही 10 हजार कोटी रुपये किमतीची मालमत्ताही पावसापासून सुरक्षित ठेवू शकत नाही. या बंगल्यातही पाणी भरलं आहे. हा मुंबईतील अमिताभ बच्चन यांचा बंगला आहे.”

अजय देवगण याच्या बंगल्यात पाणी..

व्हिडीओतून इन्फ्लुएन्सर म्हणतोय, ‘तु्म्ही पाहू शकता, नाल्याचं पाणी ओव्हरफ्लो होत आहे… BMC चे काही अधिकारी देखील याठिकाणी आहेत.’ इन्फ्लुएन्सरने अजय देवगणचं घरही दाखवलं, ज्यावर पावसाचा परिणाम झाला. पण अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील ‘जनक’ हा बंगला पाण्याखाली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पावसाच्या पाण्याने मुंबईला पूर्णपणे झोडपलं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा