AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही लोक आपल्यातून निघून जातात, पण… बिग बी यांना शोक अनावर, KBC 18 च्या मंचावरून नाना पाटेकर यांना वाहिली श्रद्धांजली

Amitabh Bachchan On Nana Patekar: 8 ऑक्टोबर रोजी सकाळी नाना पाटेकर यांचं पहाटे निधन झालं. मित्र काळाने हिरवल्यानंतर बिग बी यांना मोठा धक्का बसला. कोण बनेगा करोडपतीच्या सेटवर त्यांनी पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

काही लोक आपल्यातून निघून जातात, पण... बिग बी यांना शोक अनावर, KBC 18 च्या मंचावरून नाना पाटेकर यांना वाहिली श्रद्धांजली
अमिताभ बच्चन, नाना पाटेकर
| Updated on: Oct 09, 2026 | 7:35 AM
Share

Amitabh Bachchan Tribute Nana Patekar: संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले. मित्र काळाने हिरावल्यानंतर बिग बी यांना शोक अनावर झाला. महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या (Kaun Banega Karorepati) सेटवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. नानांचा साधेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि सत्य मांडण्याच्या धाडसाबद्दल त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी मित्राच्या आठवणींना KBC 18 च्या सेटवर उजाळा दिला. काल नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधनं झालं. त्यांच्यावर पुणे येथील डोणजे गावातील नानाची वाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिग बी यांना शोक अनावर

KBC 18 च्या सेटवर बिग बी यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. इथं उपस्थित सर्वांना मला सांगायचं की, नाना पाटेकर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. एक असाधारण कलाकार, मित्र, हितचिंतक आणि उत्कृष्ट समाजसेवक आज आपल्यात राहिलेला नाही. त्यांचं स्पष्टवक्तेपणा, साधेपणा आणि सत्य बोलण्याचं धाडस त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत होतं, असे बिग बी म्हणाले.

एक मोठी हानी

कौन बनेगा करोडपती 18 च्या सेटवर नाना पाटेकर यांच्याविषयी बोलताना बिग बी भावुक झाले. त्यांनी याच मंचावर त्यांच्याशी झालेल्या भेटीला उजाळा दिला. नानांचं जाणं ही केवळ सिनेसृष्टीसाठीच नव्हे, तर त्यांना वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोटी हानी आहे, अशा संवेदना त्यांनी व्यक्त केल्या.

काही लोक आपल्यातून निघून जातात

काही लोक शारिरिकदृष्ट्या आपल्यात नसले, तरी त्यांचे शब्द, त्यांचं कार्य आणि त्यांनी दिलेले धडे आपल्यासोबत कायम असतात. काही लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात. पण त्यांचे आवाज, त्यांची समाजसेवा आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्यातच राहतात. नाना हे अशाच व्यक्तींपेकी एक होते असे अमिताभ बच्चन म्हणाले. त्यांनी नाना पाटेकर यांना नमन केले आणि श्रद्धांजली वाहिली. केबीसीच्या सेटवर यापूर्वी नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती आणि नाम फाऊंडेशनकडून होणाऱ्या मदतीची माहिती दिली होती.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू