पिता पुत्र दोनों…, अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसोबत पोस्ट केलेल्या ‘त्या’ फोटोची चर्चा
Amitabh Bachchan - Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट, कॅप्शनने वेधलं चाहत्यांचं लक्ष, पोस्ट केलेल्या फोटो अभिषेक बच्चन आणि...., . फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. सर्वत्र पोस्टची चर्चा...

महानायक अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील बिग बी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन देखील दिसत आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी मुलासोबत फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे. फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चन यांच्यासोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘पिता पुत्र दोनों बैठे, एक जगह ही काम पे, जल्द आवे पर्दे पर जोड़ी, इनके अद्भुत काम के….’ असं लिहिलं आहे. बिग बी यांची पोस्ट आणि कॅप्शन पाहिल्यानंतर दोघे पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. बिग बी यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
T 5035 – पिता पुत्र दोनों बैठे , एक जगह ही काम पे ; जल्द आवे पर्दे पर जोड़ी , इनके अद्भुत काम के 🤣 pic.twitter.com/WCLBPAXYBp
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 8, 2024
सांगायचं झालं तर, पूर्वी अनेक सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन – अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा दोघे एकत्र चाहत्यांच्या भेटीस येणार… अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. बिग बी यांनी मुलासोबत काम करणार असल्याची घोषणा केली आहे. पण प्रोजेक्टचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
अमिताभ बच्चन – अभिषेक बच्चन यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी पाच सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांचा पहिला सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाचं नाव ‘सरकार’ असं होतं. दुसरा सिनेमा ‘बंटी और बबली’ होता. दोन्ही सिनेमे 2005 मध्येच प्रदर्शित झाले होते.
अमिताभ बच्चन – अभिषेक बच्चन यांच्या तिसऱ्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2006 मध्ये त्यांचा ‘कभी अलविदा ना कहना’ सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरकार राज’ मध्ये दोघे दिसले. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पा’ सिनेमात देखील अमिताभ बच्चन – अभिषेक बच्चन यांनी दमदार भूमिका साकारली होती.
