कोण आहे अमिताभ बच्चन यांचा जावई? आहेत करोडोंचे मालक, कमाई जाणून धक्का बसेल?
अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनबद्दल सर्वांनाच माहित आहे. पण त्यांचे जावई म्हणजे श्वेता बच्चनचे पती यांच्याबद्दल फार कोणाला माहित नाही. त्यांचा बिझनेस काय आहे? त्यांची कमाई किती? याबद्दल जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चा असलेल्या घराण्यांपैकी एक घराणं म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन कुटुंबातील सर्वांचच बॉलिवूडमध्ये काहीना काही खास ओळख आहे. यात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि तिचे पती देखील यात आहेत. श्वेताबद्दल तिच्या कामाबद्दसल तसं सर्वांना माहितच आहे. पण तिच्या पतीविषयी फारशी माहिती नाही.
श्वेता एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तिचे पती निखिल नंदा एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांची गणना भारतातील टॉप बिझनेसमनमध्ये केली जाते. ते Escorts(एस्कॉर्ट्स ) और Kubota Limited (कुबोटा लिमिटेड ) सारख्या कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
कपूर आणि बच्चन कुटुंबाशी फार जवळचे नाते
निखिल नंदा यांचा जन्म 18 मार्च 1974 रोजी दिल्लीतील एका श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील राजन नंदा हे एस्कॉर्ट्सचे अध्यक्ष होते आणि आई रितू नंदा ही चित्रपट निर्माते राज कपूर यांची मुलगी. निखिल हे कपूर कुटुंबाचा नातू आणि बच्चन कुटुंबाचा जावई आहेत.
श्वेता बच्चनसोबतचे लग्न इंडस्ट्रीसाठी खूप खास होते
श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांचे लग्न 16 फेब्रुवारी 1997 रोजी झाले. हे लग्न मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठ्या लग्नांपैकी एक ठरले. या जोडप्याला दोन मुले आहेत. सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या नव्या नवेली नंदा महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी एक व्यासपीठ देखील चालवते. श्वेताचा मुलगा अगस्त्य नंदा याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांचा हा जावई आहे करोडोंचा मालक
निखिल नंदा यांनी1997 मध्ये एस्कॉर्ट्स लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. हेच काम करत असताना ते 2013 मध्ये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाले.20121 मध्ये एस्कॉर्ट्सने जपानच्या प्रसिद्ध कंपनी कुबोटा कॉर्पोरेशनसोबत भागीदारी केली, त्यानंतर कंपनीचे नाव एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड असे ठेवण्यात आले. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ते 60 ते 80 कोटींच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातं. त्याच वेळी, त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल जवळपास 7000 कोटी आहे.
