‘वेळ आलीये…’ अमिताभ बच्चन का सारखं तेच ट्विट करतायत? आता सांगितलं खरं कारण
अमिताभ बच्चन यांनी केल्या काही दिवसांमध्ये ' जाण्याची वेळ आली आहे' असं ट्वीट वारंवार केलं आहे. 15 फेब्रुवारी 2025ला म्हणजे कालही त्यांनी सेम हेच ट्वीट केलं आहे. पण यावेळी अमिताभ यांनी या ट्वीटचं खरं कारण सांगितलं आहे. हे कारण समजल्यावर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहेत.

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या दिवसांपासून एका गोष्टीसाठी चर्चेत आहे. अमिताभ हे गेल्या काही दिवसांपासून एक ट्विट वारंवार करत आहेत. त्या ट्विटवरून आता नेटकरी चांगलेच गोंधळात पडले आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर किती अॅक्टीव्ह असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
अमिताभ बच्चन कोणत्याना कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असतात. आणि ते त्यातून वेळ काढून त्यांचे अपडेट ट्विटवरून, इतर सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअरही करत असतात. त्यांच्या भावना देखील ते ट्विटवरून अनेकदा शेअर करत असतात.
अमिताभ बच्चन यांचं ट्विट घाबरवणारं
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी असं काही ट्विट केलं ज्यामुळे चाहते घाबरले होते. अमिताभल यांनी ‘आता जाण्याची वेळ आली आहे’ असं ट्विट केलं होतं पण याचा अर्थ चाहत्यांना समजला नव्हता. त्यामुळे नक्की अमिताभ यांना काय सांगायचंय? किंवा त्यांची तब्येत बरी आहेने असे अनेक प्रश्न यावेळी चाहत्यांना पडले होते. काहींनी तर भावूक होत ‘असे बोलू नका’, असे म्हटले होते. तर, तर काही जण बिग बींच्या कामाशी या वाक्याचा संबंध जोडत होते.
‘असं लिहू नका सर.’… चाहते भावूक
एका एक्स युजरने अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, ‘कुठे जायची वेळ आली आहे सर?’ आणखी एका युजरने लिहिलं की, ‘असं लिहू नका सर.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘सरजी, तुम्ही हे काय लिहित आहात? याचा अर्थ काय आहे?’. आणखी एका युजरने लिहिलं की, ‘सर, असं बोलू नका, तुम्ही सुपरहिरो आहात.’ अशा अनेक भावना चाहत्यांनी त्यांच्या काळजीने केल्या होत्या. तर काहींना बिग बी आता अभिनयाच्या जगातून निवृत्त होण्याचा विचार करत आहेत का? ते निवृत्तीचे संकेत तर देत नाहीयेत ना? असही वाटलं होतं.
अमिताभ यांचं पुन्हा तेच ट्विट
7 फेब्रुवारी रोजी केलेल्या पहिल्या ट्विटनंतर बिग बींनी पुन्हा 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री “जाण्याची इच्छा होती पण जाता आलं नाही” असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता अमिताभ बच्चन यांनी पुन्हा 15 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3 वाजून 32 मिनिटांनी तशाच स्वरुपाचं ट्विट केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत लिहिलं की, ‘जाण्याची वेळ आली आहे….झोपायला’
मात्र यावेळी अमिताभ यांनी सांगितलं ट्विटमागचं खरं कारण
‘गेल्या ट्विटमध्ये अमिताभ यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे चाहत्यांच्या लक्षात न आल्यामुळे गोंधळ झाला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी यावर मौन बाळगलं होतं. मात्र यावेळी ट्विट शेअर करत अमिताभ बच्चन यांनी जाण्याची वेळ आली पण कशाची? याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे झोपायला जाण्याची वेळ आली. जेणेकरून चाहत्यांचा गैरसमज होणार नाही.
आम्ही घाबरलोच होतो…. युजर्सची प्रतिक्रिया
अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, ‘जाण्याची वेळ झाली आहे….झोपायला’ आणि ‘झोपायला जाण्याची वेळ झाली आहे’ या दोघांचा अर्थ वेगळा आहे सर, लोक घाबरतील.’ तर दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिलं की, ‘तीन वाजता झोपता, खूप उशीर झालाय’ तर तिसऱ्या युजरने लिहिलं की, ‘आम्ही घाबरलोच होतो, पूर्ण वाचल्यानंतर कळलं’ तर इतर नेटकऱ्यांनी शुभ रात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
T 5287 – जाने का समय आ गया है …. सोने 😴
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 13, 2025
अशापद्धतीने अमिताभ हे त्यांच्या चाहत्यांशी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जोडले राहण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आतापर्यंत पाहून असं लक्षात आलं आहे की चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ट्विटर हे माध्यम बिग बींना खूप आवडत. त्यामुळे जे काही असेल ते ट्विटद्वारे आपल्या चाहत्याना सांगत असतात.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल काहीसं
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 16’ होस्ट करत आहेत. ते 2024 मध्ये रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टियन’ चित्रपटात दिसले होते. सध्या त्यांनी कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही, परंतु असं म्हटलं जात आहे की, ते नितेश तिवारीच्या ‘रामायण’ मध्ये दिसणार आहेत.