अनन्या पांडे हिचा ‘तो’ व्हिडीओ पाहून लोक हैराण, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांना एकत्र बघताच…

अनन्या पांडे ही सध्या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. अनन्या पांडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

अनन्या पांडे हिचा तो व्हिडीओ पाहून लोक हैराण, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांना एकत्र बघताच...
Ananya Pandey
| Updated on: Sep 05, 2024 | 12:34 PM

चंकी पांडेची लेक अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. अनन्या पांडेचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता लवकरच अनन्या पांडे हिची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना अनन्या पांडे दिसत आहे. नुकताच या वेब सीरिजची स्पेशल स्क्रनिंग ठेवण्यात आली. यावेळी अनेक मोठे कलाकार अनन्या पांडेला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले. आता यावेळेचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधील एक व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

अनन्या पांडे, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये अगोदर अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन हे फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. मात्र, तिथे सारा अली खान ही पोहोचते आणि कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे एकमेकांना बोलतात.

सारा अली खान ही तिथे पोहोचल्यानंतर एक वेगळेच वातावरण तयार झाले. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. यावेळी सारा आणि कार्तिक एकमेकांमध्ये बोलण्यात व्यस्त होतात. बाजूला अनन्या पांडे ही उभी दिसत आहे. मात्र, तिला कोणीही बोलत नाही. हेच अजिबात अनन्या पांडे हिला पटले नाही.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन बोलत असताना चेहऱ्यावर काहीतरी वाईट एक्सप्रेशन देताना अनन्या पांडे ही दिसत आहे. मात्र, सारा आणि कार्तिक आपल्या बोलण्यामध्येच व्यस्त आहेत. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान बोलत असल्याचे अजिबातच अनन्या पांडेला पटत नसल्याचे त्या व्हिडीओमधून दिसत आहे.

अनन्या पांडे हिचा हा व्हिडीओ पाहून लोकही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी म्हटले की, ते दोघे बोलत आहेत तर तुला काय समस्या आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले गेले. मात्र, काही दिवसांपूर्वीच यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली. मात्र, दोघांनीही ब्रेकअपच्या चर्चांवर काहीच भाष्य केले नाही.