Marathi Serial : अनिरुद्धच्या कारला अपघात!,’आई कुठे काय करते’ मालिकेत धक्कादायक वळण

Marathi Serial : अनिरुद्धच्या कारला अपघात!,'आई कुठे काय करते' मालिकेत धक्कादायक वळण

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’या मालिकेला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (Aniruddha's Car Accident !, Shocking turn in 'Aai Kuth Kay Krte' serial)

VN

|

Jan 23, 2021 | 2:08 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’या मालिकेला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत आता लवकरच एक धक्कादायक वळण येणार आहे. एकीकडे अरुंधतीनं अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस दिली आहे तर दुसरीकडे संजनाचं वागणंही अनिरुद्धला खटकू लागलं आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशीच काहीशी अवस्था अनिरुद्धची झाली आहे. अशात स्वत:च्या चुकीमुळे एकटा पडलेल्या अनिरुद्धच्या मनात बरीच मानसिक उलथापालथ सुरु आहे. याच तणावात असताना आता मालिकेत अनिरुद्धच्या कारला अपघात होणार आहे. अरुंधती आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारा हा प्रसंग आहे. त्यामुळे आता या कठीण प्रसंगात अनिरुद्धच्या मदतीसाठी अरुंधती उभी रहाणार की संजना अनिरुद्धसाठी पुढे येणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना अनिरुद्ध साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, ‘अनिरुद्ध साकारणं हे पहिल्या दिवसापासून मी आव्हान म्हणूनच स्वीकारलं आहे. १२ वर्षांपूर्वी तो संजनाच्या प्रेमात पडला. पण या सगळ्यात त्यानं त्याच्या कुटुंबाला सांभाळलं. अनिरुद्धचं वागणं नितिमत्तेला धरुन नसलं तरी त्याची अशी वेगळी बाजू आहे. आता त्याचं आयुष्य अश्या वळणावर येऊन पोहोचलं आहे जिथे २५ वर्षांचा संसार एकीकडे आणि संजनावरचं प्रेम एकीकडे अश्या दोन्ही गोष्टींमध्ये तो अडकला आहे. अनिरुद्ध खऱ्या अर्थानं असहाय्य झाला आहे. याच तणावामध्ये त्याचा अपघात होतो. हा प्रसंग शूट करणं देखील अतिशय आव्हानात्मक होतं. मरणाच्या दारात असताना अनिरुद्धच्या मदतीला कोण येणार हे आई कुठे काय करते मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.’

संबंधित बातम्या 

Varun-Natasha Wedding : वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी खास बंदोबस्त, लग्नस्थळी मोबाईल वापरण्यास मनाई

मोत्यांच्या ड्रेसमध्ये दिसला नोराचा ‘मधुबाला’वाला लूक, डिझायनर कोण?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें