अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यावर थेट चोरीचा आरोप, वाचा नेमके घडले काय?
अंकिता लोखंडे हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

मुंबई : बिग बॉस सीजन 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 चा नुकताच विकेंडचा वार हा पार पडलाय. यावेळी काही मोठे खुलासे करण्यात आले. बिग बॉस 17 मध्ये आता थेट टीव्ही अभिनेत्री आणि बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका करणारी अंकिता लोखंडे हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. फक्त अंकिता लोखंडे हिच नाही तर थेट अंकिता लोखंडे हिच्यासोबत तिचा पती विकी जैन याच्यावर देखील आरोप करण्यात आले.
विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यावर थेट चोरीचा आरोप करण्यात आलाय. नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो हा तूफान व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यावर कॉफी चोरीचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा आरोप मुनव्वर फारुकी याच्याकडून करण्यात आलाय.
यावरूनच बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा हा होताना दिसतोय. हा प्रोमो पाहून पुढे काही दिवस बिग बॉस 17 मध्ये धमाका होणार हे नक्की दिसतंय. मुनव्वर फारुकी हा बिग बॉस 17 मध्ये जबरदस्त गेम खेळताना दिसतोय. विशेष म्हणजे आता येणाऱ्या भागामध्ये थेट मुनव्वर फारुकी आणि विकी जैन यांच्यामध्ये वाद होताना दिसणार आहे.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून मुनव्वर फारुकी आणि विकी जैन यांच्यामध्ये खास मैत्री ही बघायला मिळाली. मात्र, पहिल्यांदाच हे भांडणे करताना दिसणार आहे. यावेळी ऐश्वर्या शर्मा ही थेट भाडमध्ये गेली कॉफी हे म्हणताना दिसत आहे. म्हणजेच काय तर कॉफीवरून बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांनी कॉफी चोरल्याचे सांगितले जाते.
नुकताच विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा विकी जैन आणि नील भट्ट यांचा क्लास लावताना दिसला. कारण बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्याच्या अगोदर विकी जैन याने नील भट्ट याला फोन केला. यावेळी त्यांचे नेमके काय बोलणे झाले हे विचारताना देखील सलमान खान हा दिसला. विकी जैन आणि नील भट्ट यांच्याकडून खुलासा देखील करण्यात आला आहे.
