AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसमधील ‘त्या’ कृत्याबद्दल अंकिता लोखंडेला पश्चात्ताप; स्वत:च दिली कबुली

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अखेर अंकिता लोखंडेनं माध्यमांना मुलाखती देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती माध्यमांना दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं गेलं होतं. यामागचं कारणसुद्धा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

बिग बॉसमधील 'त्या' कृत्याबद्दल अंकिता लोखंडेला पश्चात्ताप; स्वत:च दिली कबुली
अंकिता लोखंडेImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 07, 2024 | 1:45 PM
Share

मुंबई: 7 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस 17’मधील प्रवास फारच चर्चेतला होता. टॉप 4 पर्यंत पोहोचून ती बाद झाली. मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार या तिघांना तिने तगडी टक्कर दिली होती. ग्रँड फिनालेनंतर अंकिताचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही ती माध्यमांना मुलाखती देण्यास तयार नव्हती. इतकंच नव्हे तर फिनालेनंतर ती पत्रकारांकडे दुर्लक्ष करत निघून गेली होती. यावर आणि मन्नारा चोप्रासोबतच्या भांडणावर आता ती मोकळेपणे व्यक्त झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती बिग बॉसशी संबंधित विविध मुद्द्यांवर बोलली.

मीडियाला का दुर्लक्ष केलं?

“शो संपल्यानंतर मी निराश किंवा उदास नव्हते. पण माझी तब्येत बरी नव्हती. मला फक्त घरी जाऊन आराम करायचं होतं. मी माध्यमांना दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांची माफी मागते. माझी प्रकृती अजूनही पूर्णपणे बरी नाही”, असं स्पष्टीकरण अंकिताने दिलं. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला अंकिता आणि मन्नारा चोप्रा यांची चांगली मैत्री होती. मात्र मन्नाराची जवळीक विकीसोबतच वाढताच अंकिताच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. बिग बॉसच्या घरात या दोघींमध्ये खूप भांडणं झाली.

त्या गोष्टीचा पश्चात्ताप

मन्नारासोबतच्या वादाबद्दल अंकिताने आता पश्चात्ताप व्यक्त केला आहे. याविषयी ती पुढे म्हणाली, “बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मी एपिसोड्स बघत होती आणि तेव्हा मी पाहिलं की सुरुवातीला माझं मन्नाराशी खूप चांगलं जमायचं. पण नंतर तिने तिचा मार्ग बदलला. तिला काही गोष्टी जाणवू लागल्या होत्या आणि त्याबद्दल माझी कोणतीच समस्या नव्हती. पण शेवटच्या काही एपिसोड्समध्ये माझ्यात आणि विकीमध्ये बऱ्याच गोष्टी चालू होत्या. त्यात मला त्यांची मैत्री खटकू लागली होती. मन्नारा आणि माझ्यात वाद होते पण तिचे मित्र तिला सोडून गेल्यानंतर ती विकीकडे आली होती. त्यामुळे विकीच का, असा प्रश्न मला पडला होता. हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या आणि माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. पण जेव्हा मी बाहेर आल्यानंतर एपिसोड्स पाहू लागले, तेव्हा मला समजलं की असं काहीच नव्हतं. सगळे माझ्या मनाचे खेळ होते. आता मला त्या गोष्टींचा पश्चात्ताप होतो.”

ट्रोलिंगवर प्रतिक्रिया

अंकिताला अनेकदा सोशल मीडियावर बॉडीशेम आणि ट्रोल केलं गेलं. त्यावरही तिने प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही जेव्हा बिग बॉसमध्ये जात होतो, तेव्हा आम्हाला कल्पना होतीच की असं काहीतरी घडेल. त्यामुळे आम्ही सर्व प्रकारच्या ट्रोलिंगसाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो. ते बिग बॉसचं घर होतं. तिथे तुम्ही कोणाला रोखू शकत नाही की माझ्याबद्दल बोलू नका. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. मीसुद्धा लोकांबद्दल बोलले आहे. पण मी कोणालाच बॉडीशेम केलं नाही”, असं ती पुढे म्हणाली.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच