उमेश कुमावत यांच्या ‘थक गया…’ रॅप साँगवर अंकुश चौधरीचा ठेका, पाहा VIDEO

'टीव्ही 9 मराठी'चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्या 'थक गया मैं साला' या रॅप साँगवर सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटमध्ये सिने अभिनेता अंकुश चौधरी याच्यासह कॉलेज तरुणाई थिरकली. यावेळी अंकुशसह कॉलेज युवतींनी उमेश कुमावत यांच्या रॅपवर चांगलाच ठेका धरला.

उमेश कुमावत यांच्या 'थक गया...' रॅप साँगवर अंकुश चौधरीचा ठेका, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 12:47 AM

शंकर देवकुळे, Tv9 प्रतिनिधी, सांगली | 29 फेब्रुवारी 2024 : ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्या ‘थक गया मैं साला‘ या रॅप साँगवर सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटमध्ये सिने अभिनेता अंकुश चौधरी याच्यासह कॉलेज तरुणाई थिरकली. यावेळी अंकुशसह कॉलेज युवतींनी उमेश कुमावत यांच्या रॅपवर चांगलाच ठेका धरला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सन्मान पुरस्कार 2024 चे आयोजन संजय भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज येथे करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिनेते अंकुश चौधरीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान पुरस्कार देण्यात आला. या कर्यक्रमाचे आयोजक संजय भोकरे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ भोकरे यावेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात अंकुश चौधरी आणि कॉलेज युवतींनी ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्या ‘थक गया मैं साला’ या रॅप साँगवर डान्स करीत मनमुराद आनंद लुटला.

‘तुमच्या मनातील सुप्त कलाकार जागृत करा’, अंकुश चौधरीचं आवाहन

“तुमच्या मनातील सुप्त कलाकार जागृत करा. उमेश कुमावत यांनी वेळात वेळ काढून त्यांची कला जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही सर्वांनी कलेला न्याय द्यावा”, असं अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला. “संस्थेला कोणतीही गरज लागली तर नक्कीच मी मदत करायला तयार आहे. कलेसाठी स्वतंत्र इमारत उभी करू”, असंही अंकुश चौधरी म्हणाले. यावेळी अंकुश चौधरी याने त्यांच्या तंदुरुस्तीचं गुपित सांगितलं. “माझ्या तंदुरुस्तीचे राज सर्व प्रेक्षक आहेत. मी तुमच्यातील हिरो आहे. घरचे खाणे खातो, चांगले विचार चांगले मित्र. मी जे काय केले ते स्ट्रगल नाही. मी मित्रांसोबत सर्व गोष्टी एन्जॉय केल्या आहेत. नेहमी आनंदी राहण्याचे काम केले. कधीही रडत बसलो नाही”, असं अंकुश म्हणाला.

“मला आता नाटक करायचे नाही. अजून वेळ आहे. मी विष्णुदास भावे नाट्यगृहाबाहेर नोकरी करायचो. शाहीर साबळे यांच्या लोकधारा पासून मी सुरुवात केली. शाळा, कॉलेजमुळे खूप चांगले मित्र मिळाले. सोशल मीडियामुळे मैत्री आणखी घट्ट झाली. घरच्यांचा विरोध होता. पण मित्रांमुळे मी यात सक्रिय झालो. तुमचीच शक्ती, प्रेरणा मला फ्रेश ठेवते. रसिकांना आवडणारे चित्रपट देण्याचा माझा प्रयत्न आहे”, असं अकुशने यावेळी सांगितलं.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...