AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंटिमेट सीन करताना उत्तेजित झाला अभिनेता, कट बोलल्यानंतरही..; अन्नू कपूर यांनी सांगितला प्रसंग

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते अन्नू कपूर सेटवरील इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी एका अभिनेत्याचा किस्सा सांगितला. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो थांबला नव्हता. या घटनेनंतर अभिनेत्री दोन दिवसांपर्यंत धास्तावून होती.

इंटिमेट सीन करताना उत्तेजित झाला अभिनेता, कट बोलल्यानंतरही..; अन्नू कपूर यांनी सांगितला प्रसंग
Annu Kapoor Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2026 | 3:00 PM
Share

चित्रपटांमधील इंटिमेट सीन्स कशाप्रकारे शूट होतात, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. अभिनेते अन्नू कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मोकळेपणे भाष्य केलं आहे. सेटवर असे प्रसंग घडले आहेत, जेव्हा अभिनेता अशा दृश्यांचं चित्रीकरण करताना स्वत:वरील नियंत्रण गमावून बसला आणि दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही त्याने सीन सुरूच ठेवलं. आरजे सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत त्यांनी सेटवरील असाच एक किस्सा सांगितला. ज्यात इंटिमेट सीनचं शूटिंग करताना एका अभिनेत्याने स्वत:वरील नियंत्रण गमावलं होतं. “मी कलाकारांना इंटिमेट सीन्सदरम्यान उत्तेजित होताना आणि दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही न थांबता सीन सुरूच ठेवल्याचं पाहिलं आहे. बरेच जण अशा परिस्थितीचा फायदा घेतात”, असा खुलासा त्यांनी केला.

याविषयी ते पुढे म्हणाले, “पण मी तसं कधीच केलं नाही. अशाच एका इंटिमेट सीनदरम्यान अभिनेता उत्तेजित झाला होता आणि कट म्हटल्यावरही तो थांबला नाही. अखेर अभिनेत्रीला स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी आणि तिथून पळून जाण्यासाठी खूप धडपड करावी लागली. या घटनेमुळे ती इतकी घाबरली होती की, दोन दिवस ती तिच्या खोलीबाहेर पडलीच नव्हती.” यावेळी त्यांनी त्या अभिनेत्याचं नाव सांगणं टाळलं. पण पुढे असंही सांगितलं की जर त्या अभिनेत्रीने ही मुलाखत पाहिली, तर तीसुद्धा माझ्या वक्तव्याला दुजोरा देईल.

यावेळी अन्नू कपूर यांनी विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘सात खून माफ’ या चित्रपटा अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत काम करण्याचाही अनुभव सांगितला. या चित्रपटाच्या पटकथेत एक किसिंग सीन होता, परंतु प्रियांकाला संकोच वाटत होता. “विशाल म्हणाला की ते दृश्य एका विशिष्ट कारणासाठी लिहिलं होतं आणि ते काढता येणारं नव्हतं. नंतर त्याच्या टीमने मला कळवलं की तिला सीन करण्यास अस्वस्थ वाटत होतं. मी कोणताही वाद केला नाही. तरीही ती बातमी पसरली. मी नेहमीच अशी दृश्ये प्रोफेशनलपणे हाताळली आहेत. जर एखाद्या अभिनेत्रीला संकोच किंवा अस्वस्थ वाटत असेल तर मी फक्त एवढंच विचारतो की ती ठीक आहे का? मी त्याहून अधिक काहीच विचारत नाही. कारण त्यामुळे समोरची व्यक्ती अधिक अस्वस्थ होऊ शकते”, असं अन्नू कपूर म्हणाले.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत