Anupam Kher | आता फक्त किरणची काळजी, अनुपम यांनी अमेरिकन वेबसीरीजला म्हटले ‘गुडबाय’!

या कठीण काळात त्यांचे पती, अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) सध्या त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत आणि सध्या ते आपले सर्व लक्ष किरण खेर यांच्या सेवेत केंद्रित करत आहे.

Anupam Kher | आता फक्त किरणची काळजी, अनुपम यांनी अमेरिकन वेबसीरीजला म्हटले ‘गुडबाय’!
अनुपम आणि किरण खेर
Harshada Bhirvandekar

|

Apr 15, 2021 | 1:43 PM

मुंबई : भाजप खासदार आणि अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांना ‘ब्लड कॅन्सर’ने ग्रासले असल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी समोर आली होती. या वृत्ताने त्यांच्या परिवाराबरोबरच त्यांचे चाहतेही दु:खी झाले आहेत. किरण खेरला मल्टिपल मिलोमा नावाचा रक्ताचा कर्करोग झाला आहे.  त्यांच्यावर सध्या मुंबईतील एका रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे (Anupam Kher leaves the American series New Amsterdam for wife kirron kher).

या कठीण काळात त्यांचे पती, अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) सध्या त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत आणि सध्या ते आपले सर्व लक्ष किरण खेर यांच्या सेवेत केंद्रित करत आहे. अशी माहिती मिळाली आहे की, अनुपम खेरने आता आपल्या पत्नीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा, यासाठी आपले काम दुय्यम स्थानावर ठेवले आहे.

अमेरिकन टीव्ही मालिका सोडली!

अनुपम खेर यांनी अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसीच्या मालिका ‘न्यू अ‍ॅम्स्टरडॅम’ला (New Amsterdam) सध्या निरोप दिला आहे. या मालिकेत ते डॉक्टर विजय कपूरची व्यक्तिरेखा साकारत होता. ही वैद्यकीय नाटक मालिका आहे. सध्या या मालिकेचा तिसरा सीझन टीव्हीवर येत आहे. ही मालिका कोविड-19च्या प्रकरणांपासून सुरू होते. सध्या संपूर्ण जगातील हे एक भयानक सत्य मालिकेत दाखवण्यात येत आहे.

रुग्णालय आणि मालिका दोघांना राजीनामा!

शोमध्ये अनुपम खेर यांनी साकारलेल्या ‘विजय कपूर’ या पात्राचा राजीनामा दिला असून त्यांनी, बेलव्यू हॉस्पिटलला निरोप दिला आहे. म्हणजेच, सध्या त्यांचे पात्र थांबले आहे. 2018पासून अनुपम सतत या मालिकेचा एक भाग महत्त्वपूर्ण भाग होते (Anupam Kher leaves the American series New Amsterdam for wife kirron kher).

लग्नाला झाली 35 वर्ष

अनुपम आणि किरण खेर यांचे 35 वर्ष झाले आहेत. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी किरण यांनी फोटो शेअर करताना अनुपमने आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. किरणने 1985मध्ये अनुपमशी लग्न केले होते, हे त्यांचे दुसरे लग्न होते. याआधी किरणचे गौतम बेरीशी लग्न झाले होते. अनुपम आणि किरण खेर यांना मुलगा आहे. सिकंदर खेर असे त्याचे नाव असून, त्याने बॉलिवूडमध्ये करिअर केले आहे.

चंदीगडच्या खासदार

किरण खेर यांनी 2014 मध्ये चंदीगडमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा लोकसभेत पोहोचल्या. 2019च्या निवडणुकीत त्या सलग दुसर्‍यांदा निवडणूक जिंकल्या आणि संसदेमध्ये त्या चंदीगडचे प्रतिनिधित्व करत आहे.

(Anupam Kher leaves the American series New Amsterdam for wife kirron kher)

हेही वाचा :

Abhishek Bachchan | ज्युनिअर बच्चनवर ओढावलं संकट, लखनऊ पोलिसांनी थांबवले चित्रीकरण, वाचा नेमकं झालं…

चिमुकला लढतोय दुर्मिळ आजाराशी, उपचारासाठी 16 कोटींची गरज, अजय देवगणने केले मदतीचे आवाहन!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें