Anupam Kher | अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने अनुपम खेर नाराज? म्हणाले, प्रत्येक गोष्ट कधीच
अनुपम खेर हे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच सतीश काैशिक यांच्या मुलीसोबत एक खास रिल्स अनुपम खेर यांनी तयार केले होते. अनुपम खेर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर केलीये.

मुंबई : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट (Movie) पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा काल करण्यात आलीये. या पुरस्कार यादीकडे सर्वांच्या नजरा होत्या. विशेष म्हणजे अशा बऱ्याच नावांची घोषणा यावेळी करण्यात आली, जी नावे कधी फार काही चर्चेत नव्हती. त्यापैकीच एक म्हणजे क्रिती सेनन. कारण बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कंगना राणावत यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, सर्वांनाच मोठा धक्का देत मिमी या चित्रपटासाठी क्रितीला पुरस्कार मिळाला. कंगना राणावत हिला किंवा तिच्या चित्रपटाला एकही पुरस्कार हा मिळाला नाही.
कंगना राणावत हिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे कंगना राणावत हिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये कुठेतरी तिची नाराजी जी जाणवत होती. विजेत्यांना देखील कंगना राणावत हिने शुभेच्छा दिल्या. कंगना राणावत हिचा पत्ता कट झाल्यानंतर अनेकांना मोठा धक्का देखील बसला.
या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये द कश्मीर फाइल्स चित्रपटाचा देखील एक दबदबा बघायला मिळाला. द कश्मीर फाइल्स चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी बेस्ट चित्रपटाचा नरगिस दत्त हा पुरस्कार द कश्मीर फाइल्स चित्रपटाला मिळाल्याने चाहत्यांमध्ये एक मोठा उत्साह हा बघायला मिळाला.
द कश्मीर फाइल्स चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद देखील जाहीर केला. मात्र, आपल्याला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार न मिळाल्याने कुठेतरी अनुपम खेर हे नाराज झाल्याचे देखील बघायला मिळाले. बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा अल्लू अर्जुन याला मिळाला आहे.
आपल्या पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी थेट म्हटले की, सर्वच गोष्टी या आपल्या मनासारख्या होत नाहीत. मी द कश्मीर फाइल्स सर्वात हा मोठा पुरस्कार मिळाल्याने नक्कीच आनंदी आहे. मात्र, मला बेस्ट अभिनेत्यासाठी पुरस्कार मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता. मात्र, प्रत्येक गोष्ट नक्कीच आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही.
आता अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट तूफान चर्चेत आलीये. अनुपम खेर यांनी असे नेमके का म्हटले याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहेत. पुष्पा चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला याला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मिळाला आहे. अल्लू अर्जुन याच्या नावाची घोषणा झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे.
