AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya Bachchan : त्यांना पाहून मी..; जया बच्चन यांच्या व्हिडीओवर रुपाली गांगुलीची प्रतिक्रिया चर्चेत

जया बच्चन यांच्या व्हायरल व्हिडीओवर आता अभिनेत्री रुपाली गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. सेल्फी क्लिक करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांनी धक्का दिला आणि त्यांच्यावर ओरडल्या. या व्हिडीओवरून अनेकांनी जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे.

Jaya Bachchan : त्यांना पाहून मी..; जया बच्चन यांच्या व्हिडीओवर रुपाली गांगुलीची प्रतिक्रिया चर्चेत
Rupali Ganguly and Jaya BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 14, 2025 | 8:47 AM
Share

ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत. संसदेच्या आवारात एका व्यक्तीने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला असता जया बच्चन यांनी त्या व्यक्तीला धक्का दिला आणि त्याच्यावर ओरडल्या. त्यांच्या अशा वागण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरून अनेकांकडून टीका केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीन राग अनावर होण्याची जया बच्चन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना अनेकदा चिडल्याचं पाहिलं गेलंय. परंतु यावेळी त्यांनी हद्दच पार केल्याची भावना नेटकरी व्यक्त करत आहेत. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत, दिग्दर्शक अशोक पंडित यांनी त्यांची कडक शब्दांत निंदा केली. आता ‘अनुपमा’ मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच रुपाली एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान पापाराझींनी तिला जया बच्चन यांच्या व्हिडीओबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रुपाली म्हणाली, “जयाजींना पाहून… मी माझ्या आईसोबत त्यांचा ‘कोरा कागज’ हा चित्रपट पाहिला होता, ज्यामध्ये वडिलांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालं होतं. ‘कोरा कागज’मध्ये जयाजींचं अभिनय पाहून मी खरंतर अभिनय करायला शिकले. मला त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही.”

अभिनेत्री कंगना राणौत यांनीसुद्धा जया बच्चन यांच्या व्हिडीओवर टीका केली. ‘सर्वाधिक बिघडलेली आणि विशेषाधिकार मिळवलेली महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही,’ अशा शब्दांत  तिने टोला लगावला होता.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी जया बच्चन त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत कॉन्स्टिट्युशन क्लबच्या बाहेर उभ्या होत्या. तितक्यात एक व्यक्ती त्यांच्या बाजूला येऊन मोबाइलमध्ये त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. त्याला पाहून जया बच्चन लगेच धक्का देतात आणि ओरडतात, “हे काय करताय तुम्ही?” त्यानंतर तो व्यक्ती जया बच्चन यांची माफी मागतो.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.