AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विश्वगुरू – विश्वगुरू म्हणणं बंद करा’, मोदी सरकारवर चिडल्या अनुराधा पौडवाल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारत विश्वगुरू बनण्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या देशात जेवढ्या गोष्टी घडत आहेत, त्या विश्वगुरू न बनण्यासाठीच घडत आहेत, असं त्या म्हणाल्या.

'विश्वगुरू - विश्वगुरू म्हणणं बंद करा', मोदी सरकारवर चिडल्या अनुराधा पौडवाल
Narendra Modi and Anuradha PaudwalImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 13, 2026 | 3:48 PM
Share

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यासोबतच करिअर आणि इतर अनेक मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. यावेळी त्यांनी राम मंदिरातील देणगीच्या चोरीवरही प्रतिक्रिया दिली आहे. अशाने भारत विश्वगुरू कसा बनणार, असा सवाल अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधर त्या म्हणाल्या की, “विश्वगुरू बनण्याची कल्पना आता चुकीच्या पद्धतीने घेतली जात आहे.”

शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी माझ्याही मनात असं होतं की, भारत विश्वगुरू बनेल. मात्र आता मी जे पाहतेय, ते सर्व विश्वगुरूच्या पदाला उलथवून टाकणाऱ्याच गोष्टी जास्त घडत आहेत. हा सर्व मूर्खपणा बंद करा. आपण अधिकाधिक शिक्षित होऊ, असं म्हटलं जातंय. पण 93 हजार शाळा तर बंद पडल्या आहेत. 2047 पर्यंत भारत विश्वगुरू बनणार, असा दावा सरकार करत आहे. पण विश्वगुरू बनण्याचा मंच आहे तरी काय? राम मंदिराच्या देणगीतही लूट झाली. आम्हाला त्या गोष्टींची यादी पाठवा, जेणेकरून आम्ही त्यावर कारवाई करू शकू.”

या मुलाखतीत अनुराधा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा खुलासा केला आहे की, त्यांनी फक्त त्यांचा मुलगाच नाही तर एक मुलगीही गमावली आहे. त्यांच्या सर्वांत मोठ्या मुलीचं 25 दिवसांतच निधन झालं होतं. या घटनेमुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अनुराधा पौडवाल यांनी हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. त्यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, सहा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन ओडिशा राज्य चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केलं आहे. त्यांचा जन्म कारवारमध्ये एका मराठी भाषिक कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव अलका नाडकर्णी होतं. संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी लग्नानंतर त्यांनी नाव बदललं. 12 सप्टेंबर 2020 रोजी किडणी निकामी झाल्याने त्यांच्या मुलाचं निधन झालं होतं.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी