AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्दर्शकाने 12 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत थाटला संसार, पण 2 वर्षात मोडला संसार कारण…

पहिल्या घटस्फोटानंतर दिग्दर्शकाने 12 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत थाटला संसार, पण तिच्यासोबत देखील 2 वर्षांनंतर घटस्फोट... कारण जाणून व्हाल हैराण, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिग्दर्शकाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

दिग्दर्शकाने 12 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत थाटला संसार, पण 2 वर्षात मोडला संसार कारण...
| Updated on: Sep 10, 2024 | 2:22 PM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांनी वयामध्ये असलेलं अंतर न पाहाता जोडीदारासोबत लग्न केलं. पण काही सेलिब्रिटी कपल असे देखील आहेत, ज्यांचं नातं लग्नानंतर फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असंच काही बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. अभिनेत्रीने स्वतःपेक्षा 12 वर्ष मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर खुद्द अभिनेत्री दुःख व्यक्त केलं होतं.

सध्या ज्या सेलिब्रिटी कपलची चर्चा रंगली आहे, ते दोघे इतर कोणी नाही तर, अभिनेत्री कल्की केक्ला आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप आहे. डेट आणि त्यानंतर लग्न केल्यानंतर काही वर्षांत दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. यावर एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं.

अभिनेत्री म्हणाली होती, ‘घटस्फोटाचा काळ सर्वात कठीण काळ होता. यातून सावरण्यासाठी नक्कीच वेळ लागतो. आम्हाला विभक्त होण्याची गरज होती. कारण तेव्हा मला अनुरागचे रिलेशनशिप आणि अन्य गोष्टींबद्दल जाणून वाईट वाटायचं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘घटस्फोटाचा निर्णय घेण्याआधी आम्ही वेळ घेतला होता. मी थेरेपी देखील घेतल्या होत्या. आता त्या गोष्टी अनेक वर्ष झाली आहेत. मी आणि अनुराग आता चांगले मित्र आहोत…’ असं देखील अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली होती.

कल्की आणि अनुराग यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. 2011 मध्ये अनुराग आणि कल्की यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला.

घटस्फोट झाल्यानंतर कल्कीच्या आयुष्यात गाय हर्शबर्ग याची एन्ट्री झाली. कल्कीचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग हा इस्रायलचा असून तो आर्टिस्ट आहे. गाय हर्शबर्ग आणि कल्कीच्या रिलेशनशिपबद्दल फार कमी लोकांना माहिती होतं. अखेर लग्न न करता फेब्रुवारी 2020 मध्ये कल्कीने मुलाला जन्म दिला. कल्की मुलासोबत कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...