AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर ही व्यक्ती म्हणते, ‘… केल्याचा पश्चाताप आजही होतोय’

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेक खुलासे समोर; अभिनेत्याने आत्महत्ये पूर्वी कोणाला केला होता फोन आणि त्या व्यक्तीला काय म्हणाला सुशांत, त्या घटनेमुळे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत...

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर ही व्यक्ती म्हणते, '... केल्याचा पश्चाताप आजही होतोय'
| Updated on: Jan 29, 2023 | 7:59 AM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याने १४ जून २०२० रोजी मुंबई मधील वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या करत स्वतःचा जीवन प्रवास संपवला. अभिनेत्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर आले. पण अभिनेत्याने आत्महत्या का केली? यामागील सत्य अद्याप समोर आलेलं नाही. सुशांतच्या आत्महत्येला जवळपास दोन वर्ष उलटली आहेत. पण आजही अभिनेत्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सुशांत ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. मालिकेचा निरोप घेतल्यानंतर सुशांतने एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं. सुशांतचा विषय निघाला तर, चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील भावुक होतात. आता एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी सुशांतबद्दल मोठा खुलासा केला आहे.

अनुराग कश्यप यांच्यासोबत सुशांतला काम करायचं होतं. पण तेव्हा अनुराग कश्यप यांनी सुशांतकडे दुर्लक्ष केलं. कारण सुशांतसोबत अनुराग कश्यप यांचे संबंध चांगले नव्हते. एका शोमध्ये अनुराग कश्यप यांनी अभय देओल आणि सुशांतसोबत असलेल्या मतभेदांबद्दल सांगितलं. सध्या अनुराग यांनी केलेला खुलासा सर्वत्र चर्चेत आहे.

सुशांतबद्दल सांगताना अनुराग कश्यप म्हणाले, ‘सुशांतसोबत झालेल्या घटनेने मला प्रचंड वाईट वाटलं. कारण तीन आठवड्यांपूर्वी त्याने मला फोन केला होता. सुशांतला माझ्यासोबत काम करण्याची इच्छा होती आणि काही दिवसांत असं झालं. तेव्हा सुशांतकडे दुर्लक्ष करण्याचा पश्चाताप आजही होतोय. मी नंतर अभयची माफी देखील मागितली.’ असं देखील अनुराग कश्यप म्हणाले

दरम्यान, दोन वर्षांनंतर देखील अभिनेत्याच्या आत्महत्येप्रकरणी नवीन खुलासे होत असतात. काही दिवसांपूर्वी रुपकुमार शाहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची माहिती त्यांनी दिली. रुपकुमार शाहा यांनी सुशांतचं शवविच्छेदन केलं आहे.

हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.