श्वेता तिवारी पासून अरबाज खान पर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी केलंय पाकिस्तानी सिनेविश्वात काम
Bollywood and TV Celebs worked in Pakistani: पाकिस्तानी सिनेविश्वात 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी निभावली महत्त्वाची भूमिका, यादीत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे... जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का...
Bollywood and TV Celebs worked in Pakistani: अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यामुळे त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत देखील वाढ झाली. पण बॉलिवूडमध्ये देखील असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी पाकिस्तानमध्ये काम केलं आहे. भारतीय सेलिब्रिटींनी पाकिस्तानमध्ये काम केल्यामुळे चर्चांना देखील रंगल्या होत्या. अनेक प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी पाकिस्तान सिनेविश्वात काम केलं आहे.
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री किरण खेर यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत किरण खेर यांनी चाहत्यांच्या मनावर राज्या केलं. पण 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खामोश पानी’ सिनेमातून त्यांनी पाकिस्तान इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होते. सिनेमाची शुटिंग परदेशात झाली होती.
अभिनेता सलमान खान याचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याने पाकिस्तानी सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. ‘गॉडफादर’ सिनेमातून अरबाज यांनी पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं.
View this post on Instagram
अभिनेत्री श्वेता तिवारी हिला देखील कोणत्या ओळखीची गरज नाही. पण 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सल्तनत’ सिनेमातून अभिनेत्याने पाकिस्तानी सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील हीट ठरला.
अभिनेत्री नेहा धुपिया हिने देखील पाकिस्तानी सिनेविश्वात काम केलं आहे. ‘कभी प्यान ना करना’ सिनेमा अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेत्री आयटम सॉग्न केला होता. सिनेमा 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता अभिनेत्री सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. अभिनेत्याने अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. एवढंच नाही तर, शाह यांनी एक नाही तर दोन पाकिस्तानी सिनेमांमध्ये काम केलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खुदा के लिए’ आणि 2013 मध्ये रिलीज झालेल्या ‘जिंदा भाग’ या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे.