Govinda Health Update: स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार गोविंदा? कशी आहे अभिनेत्याची प्रकृती?
Govinda Health Update: पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदा गंभीर जखमी, स्वतःच्या पायावर पुन्हा कधी उभा राहणार अभिनेता? प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांच्या प्रकृतीची चर्चा...
Govinda Firing Incident: हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागली आहे. स्वतःच्या रिव्हॉल्वरमधूल निघालेली गोळी अभिनेत्याच्या पायाला लागली आणि सर्वत्र खळबळ माजली. गोळी लागताच गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पण गोविंदाचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
पायाला गोळी लागल्यानंतर अभिनेत्या गोविंदा याची प्रकृती कशी आहे? गोविंदा पुर्णपणे ठिक होण्यासाठी किती काळ लागेल? किती दिवस अभिनेत्याला बेड रेस्ट सांगितलं आहे? अशा अनेक प्रश्न चाहते आणि अभिनेत्याच्या कुटुंबियांना सतावत आहे. यावर डॉक्टरांनी मोठी अपडेट दिली आहे.
View this post on Instagram
गोविंदाला स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी किती काळ लागेल?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाच्या डाव्या बाजूला हाडाला दुखापत झाली आहे. अभिनेत्यची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी आणखी 3 ते 4 आठवडे लागतील. गोविंदाच्या पायात गोळी काढण्यात आली असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली अभिनेत्याला ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अभिनेत्याला, 3 ते 4 आठवडे आराम करण्याची गरज आहे.
View this post on Instagram
अभिनेत्याला चालायचं जरी असेल तरी गोविंदाला काही दिवस वॉकरचा आधार घ्यावा लागणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर आहे. पण काळजी घेण्याची गरज आहे. सांगायचं झालं तर, गोविंदाला गोळी लागल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अनेक सेलिब्रिटी देखील त्यांच्या भेटीसाठी आहे. सोशल मीडियावर देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. या घटनेनंतर पोलिसांनी मंगळवारी गोविंदा आणि त्याची मुलगी टीना अहुजा यांचा जबाब नोंदवला आहे.