Bigg Boss 16 मध्ये मोठा ट्विस्ट; ‘या’ कारणामुळे अर्चना गौतमला शोमधून काढलं बाहेर

बिग बॉसने अर्चना गौतमला दाखवला बाहेरचा रस्ता

Bigg Boss 16 मध्ये मोठा ट्विस्ट; 'या' कारणामुळे अर्चना गौतमला शोमधून काढलं बाहेर
Archana Gautam and Shiv ThakareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 4:22 PM

मुंबई: ‘साऊथची सनी लिओनी’ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धक अर्चना गौतम बिग बॉस 16 च्या घरात चांगलीच चर्चेत आली. मात्र या शोमध्ये नुकताच मोठा ट्विस्ट आला आहे. बिग बॉसने अर्चनाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिव ठाकरेसोबत मारहाण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. बिग बॉसच्या घरात अर्चना आणि शिव यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. या भांडणादरम्यान अर्चनाने शिव ठाकरेवर हातदेखील उचलला होता.

या आठवड्यात सुंबुल तौकिर खान, गोरी नागोरी आणि प्रियांका चहर चौधरी यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. आठवड्याच्या मधेच अर्चनाला शोमधून बाहेर काढल्यानंतर आता या आठवड्यात आणखी एक एलिमिनेशन होणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अर्चना गौतमला पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात एंटरटेन्मेंट क्वीनचा किताब देण्यात आला होता. शो मध्ये ती सर्वांत एंटरटेनिंग स्पर्धक असल्याचं म्हटलं जात होतं. सलमान खाननेसुद्धा अर्चनाचं कौतुक केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्चना ही बिग बॉसच्या घरात सर्वांशी भांडतानाच दिसली. शिव ठाकरे, प्रियांका आणि सुंबुल यांच्याशी तिचे जोरदार वाद झाले.

एखाद्या स्पर्धकाशी मारहाण झाल्यानंतर बिग बॉसच्या घरातून त्याला काढून टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये मधुरिमा तुलीला शोमधून काढण्यात आलं होतं. विशाल आदित्य सिंगला फ्राईंग पॅनने मारल्याने तिच्यावर ही कारवाई झाली होती.

बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्ये पुनीत इस्सार यांनाही शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आर्या बब्बरशी त्यांचं जोरदार भांडण झालं होतं. मात्र नंतर ते पुन्हा शोमध्ये सहभागी झाले होते. पुनीत यांच्याप्रमाणेच सातव्या सिझनमध्ये कुशल टंडनलाही शोमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानेसुद्धा शोमध्ये पुन्हा एण्ट्री केली होती.

Non Stop LIVE Update
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.