Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Article 370 वर नोटांचा वर्षाव; 3 दिवसांत बजेटपेक्षा जास्त कमाई

अभिनेत्री यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक केलं जातंय. बॉक्स ऑफिसवर विद्युत जामवालच्या 'क्रॅक'सोबत यामीच्या चित्रपटाची टक्कर आहे. मात्र यामीच्या चित्रपटाने 'क्रॅक'ला अवघ्या तीन दिवसांत मागे टाकलंय.

Article 370 वर नोटांचा वर्षाव; 3 दिवसांत बजेटपेक्षा जास्त कमाई
Article 370 movieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 9:23 AM

मुंबई : 26 जानेवारी 2024 | अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ या ॲक्शन थ्रिलरशी बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. ‘आर्टिकल 370’ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील कमाईचा आकडा 22.8 कोटींवर पोहोचला आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे. यामध्ये यामीसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियामणी मुख्य भूमिकेत आहे. ‘आर्टिकल 370’ने पहिल्या दिवशी 5.9 कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी 7.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. कमाईच्या बाबतीत यामी गौतमच्या या चित्रपटाने विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ला मागे टाकलं आहे.

आर्टिकल 370 ची कथा काय?

आर्टिकल 370 हे राज्यघटनेत 17 ऑक्टोबर 1949 रोजी समाविष्ट करण्यात आलं. या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही, त्यामुळे काश्मीरला स्वत:ची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात भारतीय संविधानातील आर्टिकल 370 संबंधित कथा दाखवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये काय स्थिती होती आणि आर्टिकल 370 हटवण्यासाठी काय-काय करावं लागलं हे सर्व या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटात यामीने जुबी हस्करची भूमिका साकारली आहे. ती एक स्थानिक एजंट असून क्रिमिनल मिशनवर काम करत असते.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात प्रियामणीला राजेश्वरी स्वामीनाथनच्या भूमिकेत दाखवलं गेलंय. तर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसले. अभिनेते किरण करमरकर यांनी अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे. यात अनेकांनी यामी आणि प्रियामणीच्या अभिनयाचं कौतुक केलंय. आर्टिकल 370 काय होतं आणि ते रद्द करणं का गरजेचं होतं, हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून पहा, असं अनेकांनी म्हटलंय. अनेकांनी या चित्रपटाला साडेतीन ते चार स्टार्स दिले आहेत. चित्रपटाती कथा पूर्णवेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवते, असंही काहींनी म्हटलंय.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....