AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी बूट-चोरीची परंपरा तुम्ही पाहिलीच नसेल; शाहरुखच्या लेकाच्या व्हिडीओची तुफान चर्चा

कायमच शांत आणि चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसलेल्या आर्यन खानचा एक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अशी बूट-चोरीची परंपरा तुम्ही पाहिलीच नसेल; शाहरुखच्या लेकाच्या व्हिडीओची तुफान चर्चा
Aryan KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 23, 2026 | 4:02 PM
Share

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला तुम्ही आतापर्यंत अत्यंत शांत स्वभावात वावरताना पाहिलं असेल. तो फारसा हसत नाही किंवा कधी कोणाशी थट्टा मस्करीही करताना दिसत नाही. पण सध्या सोशल मीडियावर आर्यनचा एक असा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याला पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण याआधी आर्यनला अशा अंदाजात कधीच पाहिलं गेलं नव्हतं. आर्यन खान त्याच्या एका मित्राच्या लग्नाला पोहोचला होता. या लग्नात त्याने खूपच धमाल केली आहे. विशेष म्हणजे बूट चोरीच्या परंपरेत त्याने फक्त भागच घेतला नाही तर अशा पद्धतीने त्यात तो खेळला, जे खरंच थक्क करणारं आहे. आर्यनच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आर्यन सर्वांत आधी त्याच्या हातात नवरदेवाचे बूट घेऊन पळताना दिसतोय. त्यानंतर मुलांचा एक ग्रुप त्याचयाकडून ते बूट खेचून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु आर्यन खान पूर्ण जोर लावून ते बूट वाचवण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान त्याला तोलही जातो, पण तिथे उपस्थित असलेली एक व्यक्ती त्याला सावरते. इतकंच नाही, तर या जोरदार खेचाखेचीनंतरही तो हातात बूट घेऊन इथे-तिथे पळताना दिसून येतो. नंतर ही मस्ती इतकी वाढते की आर्यन जमिनीवर लोळून लोळून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

पहा व्हिडीओ-

आर्यन खानला सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारे कधीच वागताना पाहिलं गेलं नाही. म्हणूनच नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘ही बूट चोरीची परंपरा नाही, तर याला कुस्तीचं मैदान घोषित करा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘शाहरुख भावा.. तुझा मुलगा तर खूप मस्ती करतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा तर देसी बॉय आहे’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

आर्यन खानने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही त्याची पहिली वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली होती. त्याच्या दिग्दर्शन कौशल्याचं अनेकांनी कौतुक केलं होतं. त्यापूर्वी आर्यन ड्रग्ज प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज घेऊन गेल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या आरोपाखाली तो जवळपास महिनाभर तुरुंगात कैद होता.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत