AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? दिल्लीला रवाना होताना नाना पटोलेंच सूचक विधान

Congress : "तृणमुल काँग्रेसचाच विषय नाही. राज्यातले जेवढे पक्ष होते, त्यांची नरेंद्र मोदी सरकारने कशी अवस्था केली ते आपण बघतोय. घरात भांडणं लावायची, त्याचं शरद पवार आणि उद्धव ठाकरे मोठं उदहारण आहे. लोकशाही संपुष्टात आणण्याचं, लोकशाही संपवण्याचं काम भाजपं करतेय ते आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय" असं नाना पटोले म्हणाले.

Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? दिल्लीला रवाना होताना नाना पटोलेंच सूचक विधान
Nana Patole Image Credit source: PTI
| Updated on: Jun 12, 2026 | 8:28 AM
Share

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशा चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीत बोलावून घेतलं आहे. त्यामुळे विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. “संसदेत एका विभागाची बैठक आहे, त्यासाठी चाललोय. पण त्यावरुन एवढा मोठा गाजावाजा का होतोय ते कळत नाही” असं नाना पटोले बोलले. “राष्ट्रवादी पवार साहेबांनी प्रस्ताव पहिला दिला होता. पण काही कारणामुळे उशीर झालेला. मला असं वाटतं की, देशात जे राजकारण चाललेलं आहे. देश विकला जातोय, संवैधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी मतांचं विभाजन टाळण्यासाठी, देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष आहेत, त्यांनी एकत्रित यावं. अशी प्रक्रिया देश पातळीवर सुरु झालेली आहे” असं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

“त्याच प्रक्रियेतंर्गत तृणमुल काँग्रेस, पवारसाहेबांची राष्ट्रवादी यांची सोबत येण्याची मानसिकता, भाव पहायला मिळतोय. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी, मल्लिकाजुन खर्गे, सोनिया गांधी या सगळ्यावर मंथन करतील. देश महत्वाचा आहे, संविधान महत्वाचं आहे. काँग्रेस हायकमांड त्याप्रमाणे विचार करतय. कामाला सुरुवात झाली आहे” असं नाना पटोले म्हणाले.

मग, भुजबळांनी संधी गमावली

मला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. पण मला शरद पवारांना सोडायचं नव्हतं म्हणून मी गेलो नाही असं छगन भुजबळ म्हणाले. त्यावर नाना पटोले म्हणाले की,”छगन भुजबळ काय बोलतात, त्यांना काय प्रस्ताव होता हे मला माहित नाही. मी आता त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. भुजबळ साहेबांकडे क्षमता होती. ते ओबीसीचे मोठे नेते आहेत. ती संधी गमावली असं मी म्हणेन”

“धर्मनिरपेक्ष मतं विभाजित होत होती. त्या मतांना एकत्रित करणं गरजेच आहे. आत्ताच जे देश विकणारं सरकार आहे, मोदी सरकार त्यांना सत्तेतून बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा देशासमोर आहे. ते काम काँग्रेस पक्ष करतोय” असं नाना पटोले म्हणाले. प्रादेशिक पक्षांच्या अवस्थेवरही नाना बोलले.

देशहितासाठी काँग्रेससोबत राहिलं पाहिजे

काँग्रेसने विलिनीकरणाची ऑफर दिली का? या प्रश्नावरही नाना पटोले यांनी उत्तर दिलं. “ऑफर आम्ही कोणाला दिलेली नाही. या परिस्थितीचा पवार साहेब,सुप्रिया ताईंनी उल्लेख केलेला आहे. प्रक्रिया सुरु आहे. एकत्रित आलो पाहिजे. मतांचं विभाजन थांबलं पाहिजे. देशहितासाठी काँग्रेससोबत राहिलं पाहिजे अशी राज्य पातळीवरील पक्षांची भूमिका आहे” असं नाना पटोले म्हणाले.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा