AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मन हादरवणारा रहस्यमय प्रवास ‘असंभव’, चित्रपटाच्या टीझरने वाढवली उत्कंठा

'असंभव' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये मुक्ता बर्वे, संदीप कुलकर्णी, प्रिया बापट आणि सचित पाटील यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.

मन हादरवणारा रहस्यमय प्रवास 'असंभव', चित्रपटाच्या टीझरने वाढवली उत्कंठा
'असंभव'Image Credit source: Youtube
| Updated on: Oct 19, 2025 | 11:02 AM
Share

सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ या चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी झळकलेल्या पोस्टर्सने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते. रहस्याची चाहूल देणारं ते पोस्टर पाहून सगळेच ‘नेमकं काय?’ या विचारात पडले होते आणि आता त्याच कुतूहलाला आणखी उंची देत, चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये मुक्ता बर्वेसोबत काहीतरी अघटित घडताना दिसतंय. तिची घाबरलेली नजर, हवेलीतील गूढ शांतता आणि अचानक घडणाऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची वाढली आहे.

मुक्ता बर्वे दुहेरी भूमिकेत आहे का? हा प्रश्नही सतत मनात घोळतो. दुसरीकडे प्रिया बापटही एका गूढ भूमिकेत झळकतेय, तिचं पात्र काहीतरी लपवतंय असं जाणवतं. हवेलीत काही गुपितं दडलेली आहेत, कुणाचा तरी खून होताना दिसतो, पण कोणाचा आणि का? सचित पाटील स्वतः या गूढाच्या शोधात आहे, तर संदीप कुलकर्णीचा या सगळ्याशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले असून सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘असंभव’ पाहिल्यावर मिळणार आहेत.

या टीझरमधून स्पष्ट होतंय की ‘असंभव’ रहस्यपट असून भावना, थरार आणि अप्रत्यक्षित घटनांनी भरलेला एक मनोवैज्ञानिक प्रवास आहे. या चित्रपटात काहीतरी वेगळं, नवं आणि विचार करायला लावणारं आहे, हे काही सेकंदांतच जाणवतं. प्रेक्षकांना कधीही न पाहिलेला सिनेमॅटिक अनुभव देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, नैनितालमधील निसर्गरम्य ठिकाणांवर झालेलं चित्रीकरण, आणि तांत्रिक बाजूंची भव्यता हे सगळंच अप्रतिम दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक, निर्माते सचित पाटील म्हणाले, ”’असंभव’ हा माझ्यासाठी केवळ रहस्यपट नाही, तर मानवी मनाच्या गाभ्यात डोकावण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक पात्रात एक गूढ आहे आणि ते उलगडत जाताना प्रेक्षकांचं मन हादरणार आहे. टीमने पूर्ण समर्पणाने काम केलं असून हा चित्रपट केवळ पाहाण्याचा नसून अनुभवण्याचा आहे.”

निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, ”या चित्रपटात आम्ही पारंपरिक रहस्यपटाच्या चौकटीतून बाहेर जाऊन काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पटकथा आणि दृश्यांची मांडणी इतकी गुंतवून ठेवणारी आहे की, शेवटपर्यंत तुम्ही ‘गेस’ करू शकणार नाही. ‘असंभव’ हा मराठी सिनेमातील एक नवा प्रयोग ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.” या चित्रपटाचं सहदिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं असून प्रमुख भूमिकेत सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी आहेत.

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.