स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ मालिकेतून आसावरी जोशी मराठी टेलिव्हिजनमध्ये कमबॅक करणार!

स्टार प्रवाहवर २२ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘स्वाभिमान’ (Swabhiman) या मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ मालिकेतून आसावरी जोशी मराठी टेलिव्हिजनमध्ये कमबॅक करणार!

मुंबई : स्टार प्रवाहवर २२ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘स्वाभिमान’ (Swabhiman) या मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या मालिकेतून अभिनेत्री आसावरी जोशी (Asavari Joshi)  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अदिती सूर्यवंशी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्या प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना आसावरी जोशी म्हणाल्या की, ‘खूप वर्षांनंतर मी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. (Asavari Joshi will make a comeback in Marathi television from the series ‘Swabhiman’)

हिंदीमध्ये काम करत असल्यामुळे मराठी इण्डस्ट्रीचा संपर्क काहीसा तुटला होता. मात्र स्टार प्रवाहच्या स्वाभिमान मालिकेच्या निमित्ताने मनासारखं प्रोजेक्ट मिळाल्यामुळे मी ही भूमिका स्वीकारली. अदिती सूर्यवंशी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. अदिती सूर्यवंशी दापोलीच्या एका कॉलेजमधील प्रोफेसर आहे. जी अत्यंत बुद्धिमान आणि विचारी आहे. स्वाभिमान मालिकेच्या कथेतील नायिका म्हणजेच पल्लवीची ती आदर्श आहे.

पल्लवीसाठी अदिती मॅडम हेच तिचं विश्व आहे. पल्लवीमध्ये असणारी चमक अदितीला उमगते आणि ती खूप पुढे जावी अशी अदितीची इच्छा असते. 12 वर्षांपूर्वी वचन दिले तू मला या स्टार प्रवाहच्या मालिकेत मी भूमिका साकारली होती. स्वाभिमान मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोडले गेले आहे याचा आनंद आहे.

स्वाभिमान मालिकेचा विषय खूपच वेगळा आहे. या मालिकेत नाट्य आहे, उत्कंठा आहे यामध्ये शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी पहिल्या भागापासून ही मालिका पहावी हीच इच्छा आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘स्वाभिमान…शोध अस्तित्वाचा’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

संबंधित बातम्या : 

Marathi Movie : ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मिळणार हास्याची मेजवानी

Video | नजरंत मावतीया तरी दूर धावतीया, मनीचा ठाव तुला मिळंना, शालूचा डान्स पाहून चाहते घायाळ!

Marathi Movie : ‘हिरकणी’नंतर सोनाली साकारणार ‘महाराणी ताराबाई’, उलगडणार इतिहासाचं आणखी एक पान

(Asavari Joshi will make a comeback in Marathi television from the series ‘Swabhiman’)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI