Ashish Warang Death: अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, आजारपणामुळे झाला मृत्यू
Ashish Warang Death: हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. मूळचा गिरगावचा असणारा हा अभिनेत्या गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होता. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अनेक मोठ्या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसलेले अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. आशिष यांचा भाऊ अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
आशिष वारंग हे ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात शेवटचे दिसले होते. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांना सूर्यवंशी, दृश्यम, मर्दानी यांसारख्या आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या निधनाने आता अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अभिजीत वारंग यांनी आशिष वारंग यांच्या आठवणीत पोस्ट लिहिली आहे. “वारंग आशिष दादा, तुम्हाला खूप मिस करू. प्रथम तुम्ही हवाई दल अधिकारी म्हणून देशाची सेवा केली आणि नंतर अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली” या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
लष्करापासून अभिनयापर्यंतचा प्रवास
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही एक चांगला माणूस गमावला आहे. आम्ही तुम्हाला खूप मिस करू. अभिजीत यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकजण कमेंट करत श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. आशिष वारंग हे असे अभिनेते होते ज्यांचा प्रवास अत्यंत खास होता. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून राष्ट्राची सेवा केली होती. जरी आशिष वारंग यांनी मुख्य भूमिकांमध्ये जास्त काम केले नसले, तरी ते अनेक मोठ्या चित्रपट आणि टीव्ही शोमधील लोकप्रिय चेहरा होते.
चित्रपटांविषयी
आशिष हे रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये कॉन्स्टेबलच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. याशिवाय, ते ‘एक विलेन रिटर्न्स’, ‘दृश्यम’ आणि प्रसिद्ध वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’मध्येही दिसले होते. आपल्या छोट्या पण प्रभावी भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली होती.
