AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अथर्व सुदामेकडून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा व्हिडीओ, आक्षेप घेताच मागितली माफी; नेमकं प्रकरण काय?

लोकांना खळखळून हसवणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून अथर्व सुदामे लोकांचे जमेल तशा पद्धतीने प्रबोधनही करत असतो. सध्या मात्र त्याने अपलोड केलेल्या व्हिडीओवर काही लोकांनी आक्षेप घेतले आहेत. गणेशोत्सव आणि हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारित हा व्हिडीओ होता. मात्र त्यावर काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्याने हा व्हिडीओ डिलिट केला असून माफीही मागितली आहे. अथर्व सुदामे याने या प्रकरणी माफी मागितली असली तरी काही लोकांनी त्याला पाठिंबादेखील दिला आहे.

अथर्व सुदामेकडून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा व्हिडीओ, आक्षेप घेताच मागितली माफी; नेमकं प्रकरण काय?
atharv sudame
| Updated on: Aug 25, 2025 | 3:10 PM
Share

Atharv Sudame Viral Video : मराठमोळा सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे हा नेहमीच चर्चेत असतो. त्याने सोशल मीडियावर अपलोड केलेले व्हिडीओ नेहमची चर्चेचा विषय ठरतात. लोकांना खळखळून हसवणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून तो लोकांचे जमेल तशा पद्धतीने प्रबोधनही करत असतो. सध्या मात्र त्याने अपलोड केलेल्या व्हिडीओवर काही लोकांनी आक्षेप घेतले आहेत. गणेशोत्सव आणि हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारित हा व्हिडीओ होता. मात्र त्यावर काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्याने हा व्हिडीओ डिलिट केला असून माफीही मागितली आहे. अथर्व सुदामे याने या प्रकरणी माफी मागितली असली तरी काही लोकांनी त्याला पाठिंबादेखील दिला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धूम चालू आहे. मोठमोठ्या गणेश मंडळांकडून आकर्षक गणेशमूर्तींची स्थापना केली जाणार असून ठिकठिकाणी गणेशाचे आगमन होत आहे. घरोघरी छोटा बाप्पादेखील येत आहे. हाच संदर्भ घेऊन अथर्व सुदामेने एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओत त्याने एका प्रकारे जात आणि धर्मभेद विसरून सर्वधर्मसमभावाची जोपासना व्हायला हवी असा संदेश दिला होता. त्याने या व्हिडीओत हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही भाष्य केले होते. मात्र काही लोकांना अथर्व सुदमानेच हा व्हिडीओ आवडला नाही. आक्षेप घेतल्यानंतर मात्र सुदमाने हा व्हिडीओ डिलिट केला असून कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असे सांगत माफी मागितली आहे.

अथर्व सुदमेच्या व्हिडीओत नेमकं काय होतं?

अथर्व सुदामेचा हा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांचा आहे. या व्हिडीओत एकूण तीन पात्र आहेत. व्हिडीओत सुदामे स्वत: एका दुकानात गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठी गेलेला दिसतोय. तिथे त्याने गणेशमुर्तीची किंमत ठरवून ती घेऊन जाणार असतो तेवढ्यात मूर्तीकाराचा छोटा मुलगा त्याला जेवणाचा डबा द्यायला येतो. या छोट्या मुलाचा पेहराव पाहून मूर्ती घडवणारी व्यक्ती ही मुस्लीम असल्याचे अथर्व सुदामेला दिसते. त्यानंतर मूर्तीकार आपला धर्म समजल्यामुळे थोटा घाबरतो आणि तुम्हाला माझ्याकडून मूर्ती खरेदी करायची नसेल तर समोरही एक दुकान आहे, तिथून तुम्ही मूर्ती घेऊ शकता, असे सांगतो.

सुदामेने काय संदेश दिला?

पुढे अथर्व सुदामे मात्र गणपती घडवताना तुमच्या मनात चांगलेच भाव होते ना? माझे बाबा म्हणतात की आपण साखर व्हावं साखर शेवयांची खीरही गोड करते आणि शिरखुरमाही गोड बनवते. आपण विट व्हावं जी मंदीर तसेच मशीद उभारण्यासाठी कामी येते. आपण फुल व्हावी जे हारातही वापरले जाते आणि चादर अर्पण करण्यासाठी वापरले जाते, असे म्हणताना दिसतोय. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा, धर्मिक द्वेष न करण्याचा संदेश दिला आहे. मात्र त्याच्या याच व्हिडीओवर आक्षेप घेतला जातोय.

अथर्व सुदामेने मागितली माफी

दरम्यान, या व्हिडीओवर काही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुदामेने हा व्हिडीओ डिलीट केला आहे. त्याने गेल्या अनेक वर्षांपासून मी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ तयार करतो. या व्हिडीओच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता, असे म्हणत माफी मागितली आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.