AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूमी पेडणेकरचा कॉमेडी चित्रपट, 15 वर्षानंतर OTT वर रिलीज होताच ट्रेंडमध्ये, आजही प्रेक्षक वेळ काढून बघतात

बॉलिवूडचा कॉमेडी-ड्रामा आणि भावनिक चित्रपट, 15 वर्षानंतर OTT वर रिलीज होताच झाला प्रचंड ट्रेंड. IMDb रेटिंग देखील जबरदस्त. कोणता आहे हा चित्रपट?

भूमी पेडणेकरचा कॉमेडी चित्रपट, 15 वर्षानंतर OTT वर रिलीज होताच ट्रेंडमध्ये, आजही प्रेक्षक वेळ काढून बघतात
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 15, 2026 | 6:19 PM
Share

90च्या दशकाची हरिद्वारच्या गल्लीबोळांची पार्श्वभूमी आणि साध्या पण मनाला भिडणाऱ्या कथेमुळे ‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे. जवळपास दशकभरानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत असून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवत आहे.

आजच्या डिजिटल युगात जुने चित्रपटही पुन्हा चर्चेत येतात. सध्या Netflix वर हा चित्रपट टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये झळकत आहे. रिलीज होऊन सुमारे 11 वर्षे उलटूनही या चित्रपटाची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. प्रेक्षक फक्त हा चित्रपट पाहत नाहीत तर सोशल मीडियावर त्यातील सीन आणि डायलॉग्सही पुन्हा व्हायरल होत आहेत.

कलाकार आणि दिग्दर्शन

या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक शरत कटारिया यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आपल्या साध्या आणि वास्तववादी कथेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

चित्रपटाची कथा हरिद्वारमध्ये घडते. प्रेम (आयुष्मान खुराना) हा कमी शिक्षित मुलगा असतो, जो आपल्या वडिलांच्या भीतीमुळे स्वतःच्या इच्छेविरुद्ध संध्या (भूमी पेडणेकर)शी लग्न करतो. प्रेमला तिच्या शरीरयष्टीबद्दल संकोच वाटतो आणि तो तिला सार्वजनिक ठिकाणी स्वीकारण्यास कचरतो. दुसरीकडे, संध्या ही आत्मसन्मान जपणारी मुलगी आहे. जी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची किंमत वजनावर मोजत नाही. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होतात आणि नातं ताणतंणावात जातं.

कथेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘दम लगाके हईशा’ ही रेस. या स्पर्धेत पतीने आपल्या पत्नीला पाठीवर उचलून धावायचे असते. हीच रेस त्यांच्या नात्यातील टर्निंग पॉइंट ठरते. या प्रसंगातून त्यांच्या नात्याला नवा अर्थ मिळतो आणि प्रेक्षकांनाही भावनिकरित्या जोडून ठेवतो.

केवळ कॉमेडी नाही, तर भावनिक प्रवास

हा चित्रपट फक्त मनोरंजन करणारा नाही तर एका संघर्षमय प्रवासाची कहाणी आहे. एका बाजूला स्वतःच्या अपयशांशी झगडणारा तरुण तर दुसऱ्या बाजूला आत्मसन्मान जपणारी स्त्री या दोन व्यक्तिरेखांमधील भावनिक संघर्ष प्रेक्षकांना आपलासा वाटतो. ‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट आजही OTT वर पुन्हा रिलीज झाल्यानंतर त्याने ट्रेंडिंग लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...