Aashram 4 सीरिजचे फोटो लीक! बाबा निरालासोबत अशा अवस्थेत दिसली पम्मी पहेलवान

Aashram 4 | 'आश्रम 4' च्या प्रतीक्षेत चाहते.... बाबा निरालासोबत दिसली पम्मी पहेलवान, सीरिजचे काही फोटो लीक झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला!... आता चौथ्या सीझनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सर्वत्र 'आश्रम' सीरिजची चर्चा

Aashram 4 सीरिजचे फोटो लीक! बाबा निरालासोबत अशा अवस्थेत दिसली पम्मी पहेलवान
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 11:03 AM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा काही सीरिज आहे, ज्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या भागासाठी देखील चाहते उत्सुक असतात. अशाच सीरिजपैकी एक म्हणजे अभिनेता सनी देओल स्टारर ‘आश्रम’ सीरिज… ‘आश्रम’ सीरिजला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. एवढंच नाही तर, बॉबी देओल यांच्या बाबा निराळा या भूमिकेला काही जणांनी पसंती दर्शवली, तर काहींनी मात्र विरोध केला. सीरिजचे एक दोन नाही तर, तीन सीझन चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. आता चौथ्या सीझनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सर्वत्र ‘आश्रम’ सीरिजची चर्चा रंगली आहे. तर ‘आश्रम 4’ बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यामुळे ‘आश्रम 4’ कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा देखील चाहते करत आहेत.

‘आश्रम 4′ सीरिजची चर्चा सुरु असताना, सीरिजच्या टीमचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आश्रम 4’ ची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये बॉबी देओल आणि अभिनेत्री अदिती पोहिनकर यांच्यासोबत अन्य स्टारकास्ट देखील दिसत आहे. फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अदिती पोहिनकर हिने पोस्ट केलेत फोटो

अदिती हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘किती सुंदर ही संध्याकाळ आहे… प्रेमाने परिपूर्ण आणि मित्रांनी सजलेली…’ असं लिहिलं आहे. अदिती हिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते ‘आश्रम 4’ सीरिजबद्दल विचारत आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अदितीच्या पोस्टवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अदितीच्या पोस्टवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया येत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘जपनाम पम्मी’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जय हो गरीबों वाले बाबा की…’, ‘मिल तो गई आपको ..अब चौथा पार्ट जल्द ही…’ अशी कमेंत तिसऱ्या नेटकऱ्याने केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘आश्रम 4’ सीरिजची चर्चा सुरु आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘आश्रम 4’ सीरिजची चर्चा

‘आश्रम सीझन 3’ संपल्यानंतर शेवटच्या एपिसोडमध्ये ‘आश्रम 4’ सीझनची झलक दाखवण्यात आली. ज्यामध्ये पम्मी नववधूच्या वेशात दिसली, म्हणून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘आश्रम 4’ सीझनची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.