बच्चन कुटुंबातील एकही सदस्य घेत नाही ऐश्वर्या हिची बाजू, खरंच एकटी पडली आहे अभिनेत्री?

Aishwarya Rai | सासू म्हणून ऐश्वर्या हिच्या आयुष्यात 'ही' महिला हवी होती? ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना बच्चन कुटुंबातील मोठी गोष्ट समोर... ऐश्वर्या हिच्या आनंदात कधीही सामिल नसतं बच्चन कुटुंब?

बच्चन कुटुंबातील एकही सदस्य घेत नाही ऐश्वर्या हिची बाजू, खरंच एकटी पडली आहे अभिनेत्री?
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 11:46 AM

मुंबई | 3 मुंबई 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक आणि बच्चन कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. सांगायचं झालं तर, लवकरच अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य नंदा याचा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नातवाचा पहिला सिनेमा असल्यामुळे बिग बी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी आगत्स्य आणि अभिषेक यांना देखील एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. अशात नुकताच ऐश्वर्या हिचा वाढदिवस झाला, तेव्हा देखील बच्चन कुटुंबातील कोणीही अभिनेत्रीसोबत उपस्थित नव्हतं…

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिषेक बच्चन याने देखील सोशल मीडियावर फक्त पत्नीचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. अशात बच्चन कुटुंबातील एकही जण ऐश्वर्या हिची बाजू घेत नसल्याची चर्चा रंगली आहे. पण बॉलिवूडमध्ये अशी एक व्यक्ती आहे, जी ऐश्वर्या हिच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून अभिनेत्री रेखा आहेत.

सध्या रेखा यांचं एक वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे. रेखा म्हणाल्या होत्या, ‘ऐश्वर्या मला प्रचंड आवडते. गरज पडल्यास मी तिच्यासाठी एका वाघीणी सारखी लढेल.. स्वतःला सिद्ध करण्यासाठी ऐश्वर्याला कुठेही जायची गरज नाही.. काही लोकं ऐश्वर्या हिचं कौशल्य संपवण्याचा प्रयत्न करत आहेत? ती आपली तिजोरी आहे…’ असं रेखा म्हणाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

रेखा यांच्या स्पष्ट वक्तव्यानंतर अनेक चाहते बच्चन कुटुंबावर निशाणा साधताना दिसत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘जया यांच्यापेक्षा रेखा ऐश्वर्या हिच्यासाठी उत्तम सासू ठरल्या असत्या…’ दुसरा चाहता म्हणाला, ‘जी गोष्ट बच्चन कुटुंबाने करायला हवी, ती गोष्ट रेखा करत आहेत…’ सध्या सर्वत्र रेखा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अभिषेक याने बोटातून काढली साखरपुड्याची अंगठी

घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेक याने साखरपुड्याची अंगठी काढल्याची माहिती देखील समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये अभिनेत्रीने आराध्या हिला जन्म दिला. आता दोघे विभक्त होणार असल्याची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.