Pathaan | शाहरुखच्या ‘पठाण’ला बसणार या गोष्टीचा मोठा धक्का? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी घडली घटना

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 1:01 PM

पठाण सिनेमात असलेल्या 'बेशर्म रंग' गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला आहे. आता घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ

Pathaan | शाहरुखच्या 'पठाण'ला बसणार या गोष्टीचा मोठा धक्का? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी घडली घटना
Pathaan | शाहरुखच्या 'पठाण'ला बसणार या गोष्टीचा मोठा धक्का? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी घडली घटना

Shah Rukh Khan Movie pathaan Release : अभिनेता शाहरुख खान , जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमामा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खान मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पदार्पण करत असल्यामुळे चाहत्यांच्या उत्साह शिगेला पोहोचलेला असताना अनेक ठिकाणी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पठाण सिनेमात असलेल्या ‘बेशर्म रंग’ गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सिनेमाला कडाडून विरोध केला आहे. सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मध्यप्रदेशात अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध करण्यात आला आहे. इंदूरमध्ये बजरंग दलाच्या आंदोलकांनी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा पोस्टर बॅनर फाडून निषेध केला. त्याचवेळी ग्वाल्हेरमध्ये बजरंग दलाने चित्रपटगृह पेटवण्याची धमकी दिली आहे.

इंदूरमध्ये पठाण सिनेमाला कडाडून विरोध इंदूरमध्ये पठाण सिनेमाला कडाडून विरोध होत आहे. इंदूर येथील छत्रीपुरा पोलिस स्टेशन परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत सिनेमाचे बॅनर पोस्टर्स फाडले. पठाण सिनेमामुळे निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीनंतर इंदूरमध्ये अनेक ठिकाणी पठाणचे शो रद्द करण्यात आले आहेत.

ग्वाल्हेरमध्ये चित्रपटगृह पेटवण्याची धमकी इंदूर शिवाय ग्वाल्हेरमध्ये देखील पठाण सिनेमाला कडाडून विरोध होत आहे. ग्वाल्हेरमध्ये डीडी मॉलबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत सिनेमाला विरोध करत आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर घोषणाबाजी करत मल्टिप्लेक्स पेटवून देण्याची धमकी दिली. सिनेमाला होणारा विरोध पाहाता घटनास्थळी मोठ्या संख्येने सुरक्षा दलही तैनात आहे.

पठाण सिनेमा आज अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पण अद्यापही दीपिका पादुकोण हिच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन सुरु झालेला वाद शमलेला नाही. मध्यप्रदेशात सिनेमाला तिव्र विरोध होत आहे. आता पठाण सिनेमाला हिंदू संगठन आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तिव्र विरोध केला आहे.

दरम्यान, एकीकडे सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, तर दुसऱ्या ठिकाणी सिनेमाला विरोध होत आहे. पठाण बुधवारी प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच जवळपास ५० कोटी रुपयांच्या ॲडव्हान्स तिकीटांची विक्री केली आहे. रिपोर्टुनुसार आतापर्यंत पठाण सिनेमाचे जवळपास १३ लाख तिकीटांची विक्री झाली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI