.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt : बंद कर ना बे … धुरंधर 2 च्या यशादरम्यान संजय दत्तचा रुद्रावतार,कोणावर भडकला ? तो व्हिडीओ व्हायरल

धुरंधर 2 चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर मोठं यश मिळताना िदसत अनसून त्यातील कलाकारांचंही बरंच कौतुक होत आहे. या चित्रपटात संजय दत्तचीही महत्वाची भूमिका आहे. धुरंधर 2 च्या यशादरम्यान आता संजय दत्तचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

Sanjay Dutt : बंद कर ना बे ... धुरंधर 2 च्या यशादरम्यान संजय दत्तचा रुद्रावतार,कोणावर भडकला ? तो व्हिडीओ व्हायरल
sanjay dutt angry
| Updated on: Mar 28, 2026 | 9:02 AM
Share

धुरंधर च्या महिल्या भागाप्रमाणेच धुरंधर 2 चित्रपटानेही बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवला आहे. धुरंदर 2ला मोठं यश मिळताना दिसत असून सध्या सगळीकडे चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. या चित्रपट एसपी चौधरी अस्लमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संजय दत्तच्या कामाचीही बरीच चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान धुरंधर 2 ला मिळालेल्या यशानतर आता संजय दत्तचा (Sanjay Dutt) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओत त्याचा रुद्रावतार दिसत असून तो पापाराझींवर भडकल्याच दिसतंय. या व्हिडीओत संजय दत्ता हा त्याची पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांसह दिसला होता, फोटोग्राफर्स हे संजय व त्याच्या कुटुंबाचा व्हिडीओ कॅप्चर करत होते. मात्र तेवढ्यात तो (संजय दत्त) भडकला. बंद कर ना बे.. असं म्हणत त्याने पॅप्सना फटकारल्याचं दिसून आलं.

संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल

संजय दत्तचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. संजय आणि कुटुंबीय कारमधून उतरत होते, पॅ्स त्याचे फोटो काढत होते, व्हिडीओ शूट करत होते, मात्र तेवढ्यात संजय दत्तची नजर त्यांच्यावर पडली आणि त्याने त्यांना कॅमेरे बंद करण्यास सांगितलं. बंद कर ना बे अशा शब्दात त्याने पापाराझींना फटकारलं.

या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. “संजय दत्त हा बॉलिवूडचा अंडरटेकर आहे”, असं एकाने लिहीलं, तर दुसऱ्याने पापाराझींची खिल्ली उडवत लिहिलं, “आता प्रसाद मिळाला.” अनेक युजर्सनी हसणाऱ्या इमोजीं टाकत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धुरंधर पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये संजय दत्तची महत्वाची भूमिका

आदित्य धरच्या ‘धुरंधर 1’ आणि ‘धुरंधर 2’ चा संजय दत्त हा महत्त्वाचा भाग होता. त्याने बलुच द्वेषी असलेल्या पोलीस अधीक्षक अस्लम चौधरी यांची भूमिका साकारली होती. चित्रपटातील दत्तच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे. ‘धुरंधर 2’ च्या यशाच्या पार्श्वभूमीवर, संजय दत्तने त्याच्या आगामी ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट 15 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात संजय दत्तसोबत अमित साध, समीरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांच्या भूमिका आहेत. अभिजीत मोहन वरांग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

संजय दत्तच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्याने 2008 साली मान्यता दत्तशी लग्न केले. मान्यता दत्त आणि संजय दत्त यांना दोन जुळी मुलंही आहेतत. शहरान असं मुलाचं तर इकरा दत्त असं मुलीचं नाव आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर