AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या ‘या’ गाण्याने उडालेली जगभरात खळबळ, बप्पी लहरींचा मोठा निर्णय आणि मिळाले 4744 कोटी रुपये

बॉलिवूडचं असं एक गाणं ज्यामुळे जगभरात खळबळ उडालेली, एवढंच नाही तर, गाणं कोर्टात देखील पोहोचलं होतं. बॉलिवूडचे लोकप्रिय गायक बप्पी लहरी यांनी याबद्दल मोठं पाऊल उचललं होतं आणि त्यांना 4744 कोटी रुपये मिळेले... तर तेव्हा नक्की काय झालेलं जाणून घ्या...

बॉलिवूडच्या 'या' गाण्याने उडालेली जगभरात खळबळ, बप्पी लहरींचा मोठा निर्णय आणि मिळाले 4744 कोटी रुपये
| Updated on: Jun 07, 2026 | 11:10 AM
Share

1981 सालची घटना आहे. बॉलिवूडचे डिस्को किंग बप्पी लहरी यांनी ‘ज्योती’ सिनेमासाठी एक आयकॉनिक गाणं तयार केलं होतं. गाण्यासा संगीत दिवंगत गायक बप्पी लहरी यांनी दिलेलं, तर आवाज दिवंगत गायिका लका मंगेशकर यांनी दिलेलं. जेव्हा गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा प्रत्येकाच्या ओठांवर याच गाण्याच्या ओळी असायच्या. सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण हे गाणं प्रदर्शित झाल्याच्या 21 वर्षांनंतर हॉलिवूडने या गाण्याचे ताल चोरी केले. तुम्हाला आठवत असेल, 2002 मध्ये अमेरिकी हिप – हॉप आर्टिस्ट ट्रुथ हार्ट्स (Truth Hurts) चं एक गाणं प्रदर्शित झालं होतं आणि गाण्याचं नाव होतं, ‘एडिक्टि्व्ह’, जेव्हा भारतीयांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण ‘एडिक्टि्व्ह’ गाण्याचं बॅकग्राउंड संगीत पूर्णपणं लता मंगेशकर यांच्या ‘थोडा रेशम लगता है’ गाण्यातून घेतलं होतं.

बप्पी लहरी यांनी उचललं मोठं पाऊल…

जेव्हा ही गोष्ट बप्पी लहरी यांनी कळली, तेव्हा त्यांनी ‘एडिक्टि्व्ह’ हे संपूर्ण गाणं ऐकलं आणि तात्काळ म्यूजिक लेबल ‘सारेगामा’ सोबत अमेरिकेतील कोर्टाचा दरवाजा ठोठावला. बप्पी लहरी यांनी ‘एडिक्टि्व्ह’ गाण्याचे निर्माते डॉ. ड्रे यांच्यावर खटला दाखल केला. कोर्टात निर्माते ड्रे यांनी सांगितलं की, गाण्याचे ताल एका विदेशी रेडियो स्टेशनवर ऐकली आणि त्यांनी कल्पना नव्हती की, याचे कॉपीराइट्स कोणाकडे आहेत.

कोर्टाने सुनावलेला मोठा निर्णय

गाण्याबद्दल बप्पी लहरी आणि डॉ. ड्रे यांच्यातील कायदेशीर लढाई फार काळ चालली. अखेर या लढाईमध्ये विजय बप्पी दा यांचा झाला. कोर्टाने आदेश दिले की, गाण्यामध्ये बप्पी लहरी आणि ‘सारेगामा’ला क्रेडिट जोपर्यंत दिलं जात नाही, तोपर्यंत ‘एडिक्टि्व्ह’ गाण्याच्या सीडी आणि एल्बम विक्रीवर कोर्टाने बंदी आणली होती.

4 हजार 744 कोटी रुपये

कोर्टाने हॉलिवूड कंपनीवर मोठा दंड देखील ठोठावला. भरपाई आणि रॉयल्टी मिळवून कोर्टाने हॉलिवूड कंपनीवर 500 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार, 4 हजार 744 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.

‘ज्योती’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा त्याची कथा आणि गाण्यांमुळे दमदार हीट झाला. सिनेमात अभिनेते जितेंद्र यांनी डबल रोल साकारलेला. सिनेमात जितेंद्र यांच्यासोबत अभिनेत्री हेमा मालिनी, अशोक कुमार, शशिकला आणि अजीत यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा