AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना शाहरुख, ना रजनीकांत, या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन

शाहरुख खान, रजनीकांत यांना मागे टाकत हा अभिनेता बनला बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता. एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन.

ना शाहरुख, ना रजनीकांत, या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन
| Updated on: Jun 22, 2026 | 3:00 PM
Share

Bollywood Actor : भारतीय चित्रपटसृष्टी आज जागतिक पातळीवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटांचे बजेट वाढत असतानाच कलाकारांच्या मानधनातही अभूतपूर्व वाढ होत आहे. अशातच अभिनेता रणवीर सिंहने कमाईच्या बाबतीत असा पराक्रम केला आहे, ज्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. एका चित्रपट प्रकल्पातून तब्बल 325 कोटी रुपयांची निव्वळ कमाई करत रणवीरने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा आर्थिक विक्रम आपल्या नावावर केल्याचे समोर आले आहे.

रणवीर सिंहच्या या विक्रमी कमाईमागे त्याचा मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’ आहे. दोन भागांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन्ही भागांनी मिळून जगभरात 3,200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली तर भारतातच या चित्रपटाने 1,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि विक्रमी कमाईमुळे ‘धुरंधर’ हा भारतीय सिनेमातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

स्मार्ट बिझनेस स्ट्रॅटेजीचा मोठा फायदा

विशेष म्हणजे रणवीर सिंहने या चित्रपटासाठी पारंपरिक पद्धतीने निश्चित मानधन स्वीकारले नव्हते. त्याऐवजी त्याने ‘प्रॉफिट शेअरिंग मॉडेल’चा पर्याय निवडला. चित्रपटाच्या नफ्यातील ठराविक हिस्सा घेण्याचा निर्णय त्याने घेतला. एवढेच नाही तर चित्रपटाचा खर्च वाढू लागल्यानंतर रणवीरने स्वतःही या प्रकल्पात गुंतवणूक केली.

या धाडसी निर्णयाचा त्याला मोठा फायदा झाला. चित्रपटाच्या थिएटर कमाईसोबतच डिजिटल स्ट्रीमिंग हक्क, सॅटेलाइट हक्क आणि म्युझिक राइट्समधून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा रणवीरच्या खात्यात जमा झाला. या सर्व माध्यमांतून त्याने जवळपास 325 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे.

दिग्गज कलाकारांनाही टाकले मागे

रणवीर सिंहच्या या विक्रमाने भारतीय सिनेसृष्टीतील अनेक सुपरस्टार्सना मागे टाकले आहे. यापूर्वी सर्वाधिक कमाईचा विक्रम सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावावर होता. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ या चित्रपटासाठी त्यांनी सुमारे 250 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दक्षिण भारतीय सिनेमातील पॅन-इंडिया स्टार अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी, तर प्रभासने ‘कल्कि 2898 एडी’साठी 200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचे वृत्त होते. बॉलिवूडमध्ये शाहरुख खानने ‘पठाण’ आणि ‘जवान’सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रति चित्रपट सुमारे 200 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. मात्र रणवीर सिंहच्या 325 कोटी रुपयांच्या कमाईने हे सर्व आकडे मागे पडले आहेत.

Follow Us
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी बातमी! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग