‘टायगर 3’ रिलीज होण्याच्या अगोदरच सलमान खान याचे प्रेक्षकांना मोठे आवाहन, अभिनेत्याने थेट..
बाॅलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने काही खास धमाका केला नाही.

मुंबई : सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. टायगर 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठे क्रेझ बघायला मिळतंय. टायगर 3 चित्रपट धमाका करताना दिसणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. इतकेच नाही तर टायगर 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. आता नुकताच सलमान खान याने टायगर 3 चित्रपटाबद्दल अत्यंत मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. फक्त सलमान खान हाच नाही तर कतरिना कैफ हिने देखील एक पोस्ट शेअर केलीये.
टायगर 3 हा सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित चित्रपट उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कतरिना आणि सलमानची जोडी धमाका करणार असल्याचे सांगितले जात आहे. टायगर 3 चित्रपटाकडून निर्मात्यांना अत्यंत मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. सलमान खान हा चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.
आता सलमान खान याने पोस्ट शेअर करत म्हटले की, आम्ही टायगर 3 चित्रपट मोठ्या मेहनतीने बनवला आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट पहाल तेव्हा स्पॉयलरपासून वाचवण्याठी आम्ही तुमच्यावर नक्कीच विश्वास करत आहोत. स्पॉयलर चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात. जे योग्य आहे ते तुम्ही कराल असा आमचा विश्वास आहे. नक्कीच हा विश्वास आहे की, टायगर 3 ही तुमच्यासाठी आमच्याकडून दिवाळीची सर्वोत्तम भेट ठरेल.

टायगर 3 उद्या हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, असे सलमान खान याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता सलमान खान याने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याने ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलीये. विशेष म्हणजे कतरिना कैफ हिने देखील अशाचप्रकारची पोस्ट शेअर केलीये.
चाहत्यांना मोठे आवाहन करताना पोस्टमधून सलमान खान हा दिसत आहे. सलमान खान याच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, त्या चित्रपटाला काही खास धमाका करता आला नाही.
