AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 नेटवर्कचे एमडी, सीईओ बरुण दास यांच्या ‘डुओलॉग विथ बरुण दास’ला मिळाला सर्वोत्कृष्ट ओटीटी शोचा पुरस्कार

या कार्यक्रमात बरुण दास यांच्या 'डुओलॉग विथ बरुण दास' या कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट ओटीटी शोचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

TV9 नेटवर्कचे एमडी, सीईओ बरुण दास यांच्या 'डुओलॉग विथ बरुण दास'ला मिळाला सर्वोत्कृष्ट ओटीटी शोचा पुरस्कार
'डुओलॉग विथ बरुण दास'ने पटकावला बेस्ट ओटीटी शो पुरस्कारImage Credit source: Tv9
| Updated on: Jun 21, 2023 | 1:01 PM
Share

मुंबई : IWMBuzz डिजिटल अँड ओटीटी अवॉर्ड्सचं (IWMBuzz Digital & OTT Awards Season 5) रविवारी मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. भारतातील हा सर्वांत प्रतिष्ठित ओटीटी आणि वेब एंटरटेन्मेंट पुरस्कार सोहळा मानला जातो. या पुरस्कार सोहळ्यात TV9 नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बरुण दास यांना सर्वोत्कृष्ट ओटीटी शोच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला मीडिया आणि ओटीटी विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

मुंबईतील गोरेगावमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरस्कार सोहळ्यात मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली. मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, अपारशक्ती खुराना, सुनील शेट्टी, अदिती राव हैदरी, राशी खन्ना, वाणी कपूर, अली फजल, हुमा कुरैशी, राजकुमार राव, तमन्ना भाटिया यांसारखे कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमात बरुण दास यांच्या ‘डुओलॉग विथ बरुण दास’ या कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट ओटीटी शोचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

  1. ‘डुओलॉग विथ बरुण दास’च्या पहिल्या सिझनमध्ये त्यांनी अशा नेत्यांशी संवाद साधला, जे नवीन भारताला आकार देण्यात आघाडीवर आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती, सदगुरू, मिताली राज आणि सुभाष चंद्रा हे या सिझनमध्ये पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
  2. पुरस्कारानंतर बरुण दास म्हणाले, “न्यूज नेटवर्क चालवताना मी अनेकदा पाहिलं की, पाश्चिमात्य मीडिया भारतासाठी कथा तयार करते. मला जाणवलं की भारताला अशा व्यासपीठाची नितांत गरज आहे जी जागतिक परिस्थितीमध्ये आपली स्वत:ची कथा समर्थपणे मांडू शकेल आणि पक्षपाती दृष्टीकोनापासून स्वत:ला वाचवू शकेल. मला न्यूज 9 प्लसला (News9 Plus) जागतिक व्यासपीठ बनवायचं आहे.”
  3. बरुण दास यांच्या मते, News9 Plus हे तीन महत्त्वपूर्ण पैलूंमुळे एक क्रांतिकारी व्यासपीठ आहे. त्यातील पहिला पैलू हा बातम्या आणि चालू घडामोडींना आकर्षक कंटेटमध्ये रुपांतरित करण्याबद्दल आहे. दुसरं म्हणजे प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे, ते पाहण्यास सक्षम करते आणि तिसरा पैलू म्हणजे कंटेटची गुणवत्ता. ही गुणवत्ता इंग्रजी वृत्तवाहिन्या किंवा ओटीटीच्या जागतिक दर्जाच्या निर्मितीमूल्याशी समान आहे.
  4. 2022 मध्ये प्रतिष्ठित AFAQS Future of News 2022 मध्ये ‘डुओलॉग विथ बरुण दास’ या शोला उल्लेखनीय म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. या शोच्या उत्कृष्ट डिझाइन आणि पॅकेजिंगमुळे त्याला ‘सर्वोत्कृष्ट सेट डिझाइन’चा सिल्व्हर पुरस्कार मिळाला होता.
  5. IWMBuzz चे संस्थापक आणि मुख्य संपादक सिद्धार्थ लईक म्हणाले, “ओटीटीच्या क्षेत्रात न्यूज जॉनरचा प्रवेश पाहणं खरोखरंच उत्सुकतेचं आहे. जगातील पहिलं न्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म असल्याने News9 Plus ला खूप महत्त्व आहे. डुओलॉग विथ बरुण दास या शोनं त्याच्या अनोख्या कंटेटमुळे टॉक शोच्या चौकटीबाहेर जाऊन एक नवीन मापदंड स्थापित केला आहे.”
  6. ‘डुओलॉग विथ बरुण दास’ या ओटीटी शोनं जेनफ्लिक्समध्ये धुमाकूळ घातला आहे. News9 Plus चे संपादक संदीप उन्नीथन यांनी याविषयी आनंद व्यक्त केला. “IWMBuzz पुरस्काराने या कार्यक्रमाला मान्यता दिल्याचा मला आनंद आहे”, असं ते म्हणाले.
  7. या शोचे दिग्दर्शक कार्तिक मल्होत्रा यांनीसुद्धा बरुण दास यांचं कौतुक केलं. “चेहऱ्यावर चमचमणाऱ्या प्रकाशात संवाद साधणं सोपं नसतं. हा संवाद जेव्हा स्क्रिप्टपासून वेगळा होऊ लागतो, तेव्हा मोठमोठे अँकर्ससुद्धा घाबरतात. पण बरुण दास यांच्याबाबत असं काही घडलं नाही. ते त्यांच्या बोर्डरुममध्ये जितके सहज वावरतात, तितकाच सहजपणा कॅमेरासमोर दिसला”, असं ते म्हणाले.
  8. IWMBuzz या पुरस्कार सोहळ्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. विविध परफॉर्मन्स, संगीत आणि धमालमस्तीने परिपूर्ण असा यंदाचा कार्यक्रम होता. ओटीटी आणि वेब एंटरटेन्मेंट विश्वाला पुरस्कारांची ओळख करून देणारा हा देशातील पहिला पुरस्कार सोहळा आहे. “या पुरस्कार सोहळ्याचा प्रवास इथपर्यंत आणू शकलो याबद्दल मी कृतज्ञ आहे”, अशी प्रतिक्रिया IWMBuzz चे संस्थापक आणि मुख्य संपादक सिद्धार्थ लईक यांनी दिली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.