बबितासोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर टप्पूने केला मोठा खुलासा, म्हणाला, माझी आई चिडून…
TMKOC: तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका घरातील जवळपास सर्वच सदस्यांना आवडते. विशेष म्हणजे लहान मुलांचे विशेष आकर्षण मालिकेतील टप्पू सेना आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जुने कलाकार मालिकेला रामराम करून सोडून जाताना दिसत आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे. मात्र, अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली असून नवीन कलाकार मालिकेत दाखल झाली आहेत. दयाबेन देखील मालिकेत नाहीये. मात्र, दिशा वकानीने मालिका सोडल्याचे अजून जाहीर केले नाही. बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता सुरूवातीपासूनच तारक मेहता मालिकेसोबत सोडली आहे. टप्पू अर्थात भव्य गांधी याला तारक मेहता मालिकेतून खास ओळख मिळाली आहे. भव्य गांधीने बालकलाकार म्हणून तारख मेहता मालिकेत काम सुरू केले. अनेक वर्ष तो मालिकेसोबत जोडला होता. मात्र, भव्यने मालिकेला सोडचिठ्ठी दिली. सतत मुनमुन दत्ता आणि टप्पूच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या आहेत. हेच नाही तर दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले जाते
नुकताच भव्य गांधी ऊर्फ टप्पू आणि बबिता जी ऊर्फ मुनमुन दत्ता साखरपुडा करणार असल्याचे सांगितले जात होते. हेच नाही तर दोघांचा साखरपुडा गुजरामधील वडोदरा शहरात होणार असल्याची तूफान चर्चा होती. आता या साखरपुड्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलताना भव्य गांधी दिसला आहे. नेमके काय घडले हे त्याने सांगितले असून त्याची आई यावर काय बोलली हे देखील त्याने सांगितले आहे.
भव्य गांधीने हिंदी रशलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, या साखरपुड्याच्या चर्चेमुळे खूप जास्त गोंधळ उडाला. वडोदरामध्ये साखरपुडा करणार असल्याचे सुरूवातीला पुढे आले होते. ती एक फक्त आणि फक्त अफवा होती. माझ्या आईला फोन येत होती. सततच्या फोनमुळे माझी आई चांगलीच संतापली होती. माझी आई चिडून बोलत होती की, तुम्हाला काही कळते का? वेडे आहात? साखरपुडा होणार ही अफवा होती. मात्र, यामुळे खूप जास्त गोंधळ नक्कीच उडाला होता.
मुळात म्हणजे काही लोकांनी ही अफवा पसरवली होती आणि यामध्ये काहीच सत्य अजिबातच नव्हते. हा मात्र, त्रास झाला. गेल्या काही दिवसांपासून भव्य गांधी आणि मुनमुन दत्ता यांच्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. दोघांच्या वयामुळे खूप जास्त अंतर आहे. भव्य गांधीपेक्षा मुनमुन दत्ता फार जास्त मोठी आहे, मात्र, असे असले तरीही दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगताना दिसतात.
