बिग बॉसचा उपविजेता प्रतिकला भाईजानकडून खास गिफ्ट, इन्स्टावर फोटो शेअर करत प्रतिक म्हणतो, ‘आभार साहेब!’

तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 चं जेते पद पटकावलं पण तिच्या बरोबरीने प्रेक्षकांनी ज्याला भरभरून प्रेम दिलं त्या प्रतिक सेहेजपालला सलमान खानने विशेष भेट दिली आहे. याचा फोटो प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि सलमान खानचे आभार मानले आहेत.

बिग बॉसचा उपविजेता प्रतिकला भाईजानकडून खास गिफ्ट, इन्स्टावर फोटो शेअर करत प्रतिक म्हणतो, 'आभार साहेब!'
प्रतिक सेहेजपाल, सलमान खान
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Feb 01, 2022 | 4:43 PM

मुंबई : तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) बिग बॉस 15 चं (Big Boss 15) जेते पद पटकावलं पण तिच्या बरोबरीने प्रेक्षकांनी ज्याला भरभरून प्रेम दिलं त्या प्रतिक सेहेजपालला सलमान खानने (Salman Khan) विशेष भेट दिली आहे. याचा फोटो प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि सलमान खानचे आभार मानले आहेत. बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये प्रतिक आणि तेजस्वीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली. अन् अखेर प्रतिकला मागे टाकत तेजस्वीने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीचा प्रतिकदेखील तितकाच प्रबळ दावेदार होता.

खास गिफ्टसाठी धन्यवाद भाई

प्रतिक सेहेजपालने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात सलमान खान ब्लॅक कलरच्या टी-शर्टमध्ये दिसतोय. तर प्रतिकने व्हाईट कलरचा टी-शर्ट घातला आहे. हा टी-शर्ट सलमानने प्रतिकला भेट दिली आहे. या फोटोला प्रतिकने ‘मला सपोर्ट करण्यासाठी आणि मला हा टी-शर्ट दिल्याबद्दल थँक्यू भाई, मला वाटतं की माझ्या कामाबद्दल तुम्ही समाधानी असाल,’ असं कॅपशन दिलं आहे.

बिग बॉस 15 मुळे छोट्या पडद्यावरील स्टार प्रतिक सहजपाल हे नाव आज जवळपास प्रत्येक घरात पोहोचलं आहे. त्याने बिग बॉसमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रतिक सेहेजपाल अॅक्टिंगसोबतच मॉडेलिंग देखील करतो. तसंच तो फिटनेस ट्रेनरदेखील आहे. बिग बॉस 15 येण्याआधी त्याने एका वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

वकील प्रतिक सेहेजपाल

अभिनेता आणि मॉडेल प्रतिक सेहेजपाल याने विविध क्षेत्रातील ज्ञान घेतलं आहे. दिल्लीत जन्मलेल्या प्रतीकने एमिटी लॉ स्कूल, नोएडा येथून एलएलबी पदवी पूर्ण केली आहे. 2012-2017 मध्ये 5 वर्षांचा कोर्स केलेला प्रतिक हा पेशाने वकील आहे.

फिटनेस ट्रेनर म्हणून काम

अभिनय आणि मॉडेलिंगच्या जगात नाव कमावण्यापूर्वी प्रतिकने जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम केले आहे. मुंबईत येण्यापूर्वी तो अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा.

संबंधित बातम्या

तेजस्वी प्रकाश लोकांना आवडत नसेल पण मला आवडते : निशांत भट

‘माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?’ दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर आणि बहिण अनिशा पादुकोण म्हणाली…

Gehraiyaan Title Track : दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘गेहराईयाँ’चं टायटल साँग रिलीज, दीड तासात दीड मिलियन पार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें