AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच मॉर्निंग वॉकवेळी झालंय ‘धूम’ फेम सेलिब्रिटीचं निधन? मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

Dhoom Fame Snjay Gadhavi Death : 'धूम' फेम सेलिब्रिटीचं निधन खरंच मॉर्निंग वॉकवेळी झालंय? त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं... अखेर सेलिब्रिटीच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलंच... नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सेलिब्रिटीच्या मित्राने केला मोठा खुलासा

खरंच मॉर्निंग वॉकवेळी झालंय 'धूम' फेम सेलिब्रिटीचं निधन? मृत्यूचं धक्कादायक कारण समोर
| Updated on: Nov 21, 2023 | 1:43 PM
Share

Snjay Gadhavi Death : काही दिवसांपूर्वी सुपरहिट ‘धूम’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय गढवी यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. संजय यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. रविवारी सकाळी संजय गढवी यांनी अखेरचा श्वास घेतला. लोखंडवाला बॅकरोडमध्ये संजय गढवी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले आणि त्यांना घाम येवू लागला… याच कारणामुळे संजय गढवी यांची निधन झालं अशी माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार संजय गढवी यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तात्काळ कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पण आता संजय गढवी यांच्या निधनाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत संजय गढवी यांचं निधन मॉर्निंग वॉकवेळी झालं नसल्याची माहिती समोर आली आहे. संजय गढवी यांच्या मित्राने त्या दिवशी नक्की काय झालं होतं याची माहिती दिली आहे. एवढंच नाही तर, दिग्दर्शकाच्या मित्राने संजय गढवी यांच्या आरोग्याबद्दल देखील मोठी माहिती दिली आहे.

संजय गढवी यांचे मित्र मुलाखतीत म्हणाले, ’19 नोव्हेंबर रोजी संजय यांची सकाळ नेहमी प्रमाणे झाली. ब्रेकफास्टमध्ये संजय यांनी उकडलेली अंडी आाणि चहा प्यायले. ते त्यांच्या आवडत्या खुर्चीवर बसल होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे संजय यांनी जीममध्ये जाण्याची तयारी केली. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, तेव्हा त्यांनी पाणी मागितलं…”

पुढे मित्र म्हणाले, ‘पाणी पिण्याआधीच संजय जमिनीवर कोसळले. तेव्हा घरातील स्टाफने त्यांच्या मुलीला बोलावलं.. तेव्हा त्यांच्या मुलीने मदतीसाठी जीममधील एका मुलीला बोलावलं… पण तोपर्यंत उशीर झालेला होता… संजय यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना सीपीआर देखील देण्यात आलं.. तेवढ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं.. ‘

रिपोर्टनुसार, संजय यांना हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्यासाठी ते नियमित औषध देखील घेत होते. संजय यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांची मोठी मुलगी संजना 20 वर्षांची आणि शीना 17 वर्षांची आहे.

संजय गढवी यांचं स्वप्न

काही दिवसांपूर्वी, संजय गढवी यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली होती. सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात देखील झाल्याची माहिती समोर आली होती. पण आता सिनेमा बनवण्याचं संजय गढवी यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.