AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरात चोरी; बहिणीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे लंपास, 30 तासांनंतरही कारवाई नाही

'बिग बॉस 11' फेम अभिनेत्रीच्या घरात चोरी झाली असून अद्याप त्याविरोधात कोणतीच कारवाई झाली नसल्याची तक्रार तिने केली आहे. बहिणीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे चोरीला गेल्याचं तिने म्हटलंय. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या घरात चोरी; बहिणीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे लंपास, 30 तासांनंतरही कारवाई नाही
बंदगी कालराImage Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2025 | 10:13 AM
Share

‘बिग बॉस 11’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री बंदगी कालराच्या घरी चोरीची घटना घडली आहे. बंदगीच्या घरातून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. याविषयीची माहिती तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. बहिणीच्या लग्नाच्या काही दिवस आधी ही चोरी झाली असून लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने चोराने लंपास केल्याचं तिने म्हटलंय. बंदगीने तिच्या सोशल मीडियावर घराच्या दरवाजाचे फोटोसुद्ध शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या घराचा लॉक तुटलेल्या अवस्थेत पहायला मिळत आहे. घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू असताना चोरीची मोठी घटना घडल्याने बंदगी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचली आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

‘काल मी माझ्या घरी आले तेव्हा चोराने संपूर्ण घर उद्ध्वस्त केल्याचं पाहिलं. बऱ्याच वैयक्तिक वस्तू, पैसे चोरीला गेले आहेत. बहिणीच्या लग्नासाठी मी घरात बरीच कॅश ठेवली होती. एसडी कार्डसोबत कॅमेरासुद्धा चोरीला गेला आहे. माझ्या घराचे दोन्ही गेट तोडले गेले आहेत. एवढं सगळं होऊनही कोणाला याची कानोकान खबर लागली नाही’, असं तिने लिहिलंय. याविषयी पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांकडून अद्याप योग्य ती कारवाई झाली नसल्याचा आरोपही तिने केलाय.

‘मी चोरीच्या घटनेची पोलिसांना माहिती देऊन आता जवळपास 30 तास उलटले आहेत. ज्या प्रकारे गोष्टी घडतायत किंवा घडत नाहीयेत, ते पाहून मला असहाय्य वाटतंय. दोन दिवस उलटूनही त्यांनी अद्याप याप्रकरणी कोणतीच कारवाई केली नाही. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कुठलाच तपास नाही, लोकांना जबाबासाठी बोलावलं नाही, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले नाहीत. मला मदतीची गरज आहे. ते कसली प्रतीक्षा करतायत मला माहीत नाही. जेव्हा माझा वैयक्तिक डेटा लीक केला जाईल, तेव्हा ते कारवाई करतील का’, असा संतप्त सवाल तिने केला आहे.

बंदगीने आणखी एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, ‘मला कधीच इतकं असहाय्य वाटलं नाही. ज्या पद्धतीने गोष्टी सुरू आहेत किंवा काहीच सुरू नाही असं म्हणावं लागेल. मला आता त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि कामाबद्दलच्या हेतूंवर शंका येऊ लागली आहे. मी आपल्या व्यवस्थेबद्दल खूप निराश आहे. मला याबद्दल आधीही कल्पना होती. पण आता मी स्वत: त्याचा सामना करतेय. मग लोक विचारतात की तुम्हाला भारत का सोडायचा आहे?’

बंदगी कालराने बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या शोमध्ये तिच्या आणि पुनीत शर्मा यांच्यात अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. शो संपल्यानंतरही दोघं एकमेकांसोबत दिसले. परंतु जुलै 2023 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.