Bigg Boss 14 | बायकोसमोर अभिनवने राखीला नेसवली साडी, राखी म्हणते साडी घातली की समोसा बनवला!

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 09, 2021 | 2:58 PM

राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या (Bigg Boss 14) घरातील सर्वात मनोरंजण करणारी स्पर्धक आहे.

Bigg Boss 14 | बायकोसमोर अभिनवने राखीला नेसवली साडी, राखी म्हणते साडी घातली की समोसा बनवला!

मुंबई : राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या (Bigg Boss 14) घरातील सर्वात मनोरंजण करणारी स्पर्धक आहे. शोमध्ये ती बर्‍याचदा सर्वांना हसवते. पण गेल्या काही दिवसांपासून तिचे लक्ष अभिनव शुक्लावर आहे. राखी अभिनवला म्हणते मला साडी घालता येत नाही तु मला साडी नेसव देणार का? यावर अभिनव हो म्हणतो अभिनवचे उत्तर ऐकून राखी खूप खुश होते.राखी घरातील सर्व सदस्यांना सांगते की, आज अभिनव मला साडी नेसवणार आहे. अभिनव राखीला साडी नेसवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जमत नाही. (Bigg boss 14 Abhinav Shukla and Rakhi Sawant)

त्यावेळी राखी म्हणते की, तु अशी कशी साडी नेसवून दिली आहे मी तर समोसा दिसत आहेत. त्यानंतर अभिनव सोनाली फोगाटला बोलावून आणतो, मग सोनाली आणि अभिनव राखीला साडी घालून देतात. अली गोनी आणि निक्की तांबोळी यांना बिग बॉस कडून कठोर शिक्षा मिळाली होती. कारण त्यांनी घराच्या महत्त्वपूर्ण नॉमिनेशन प्रक्रियेचा मज्जाक उडवला होता.

निक्की आणि अली ही मज्जाक घरातील सर्वच सदस्यांना भारी पडली. बिग बॉसने घरातील इतर सदस्यांना सांगितले की, त्यांनी केलेल्या चुकीचे सजा तुम्हाला सर्वांना भेटणार आहे. त्यानंतर घरातील इतर सदस्य निक्की आणि अलीला भांडताना दिसले होते. विकास गुप्ता आणि अर्ची खानमध्ये भांडणे झाली होती. त्यावेळी अर्शी खानने विकास गुप्ता यांच्या आईवर भाष्य केले होते, त्यानंतर विकासने तिला पाण्यात ढकलले होते. अर्शीला पाण्यात ढकल्यामुळे विकास गुप्ताला बिग बॉसच्या घरातून बेघर देखील व्हावे लागले होते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानवर रुबीनाचे चाहते भडकले, पाहा काय म्हणाले!

Bigg Boss 14 Promo | बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अर्शी खानचा ड्रामा!

(Bigg boss 14 Abhinav Shukla and Rakhi Sawant)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI