Bigg Boss 16: ‘हा’ स्पर्धक रँकिंगमध्ये नंबर 1, जाणून घ्या कोणत्या स्पर्धकाला मिळाली सर्वाधिक मतं?

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 18, 2023 | 9:45 AM

बिग बॉसच्या 15 व्या आठवड्याची रँकिंग नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या स्पर्धकाने बाजी मारली आणि कोणाला सर्वांत कमी मतं मिळाली, ते पाहुयात..

Bigg Boss 16: 'हा' स्पर्धक रँकिंगमध्ये नंबर 1, जाणून घ्या कोणत्या स्पर्धकाला मिळाली सर्वाधिक मतं?
Bigg Boss 16
Image Credit source: Instagram

मुंबई: बिग बॉसचा सोळावा सिझन हळूहळू ग्रँड फिनालेकडे वळत आहे. यंदाचा सिझन चांगलाच गाजतोय आणि यातील प्रत्येक स्पर्धक चलाखीने खेळ खेळत आहे. बिग बॉसच्या घरात आता फक्त 9 स्पर्धक राहिले आहेत. या नऊ जणांमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. एकीकडे जिंकण्यासाठी स्पर्धक आटोकाट प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे चाहतेसुद्धा त्यांच्या आवडत्या स्पर्धकांसाठी जोरदार मतदान करत आहेत. बिग बॉसच्या 15 व्या आठवड्याची रँकिंग नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या स्पर्धकाने बाजी मारली आणि कोणाला सर्वांत कमी मतं मिळाली, ते पाहुयात..

9 स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस

गेल्या आठवड्यात अब्दु रोझिक, साजिद खान आणि श्रीजिता डे शोमधून एलिमिनेट झाले. साजिद खान आणि अब्दु रोझिक हे बिग बॉसचे सर्वांत स्ट्राँग स्पर्धक मानले जात होते. आता घरात फक्त 9 स्पर्धक राहिले आहेत. ज्यामध्ये प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, सुम्बुल तौकिर खान, शालीन भनोट, टीना दत्ता, निम्रत कौर आहलुवालिया, सौंदर्या शर्मा आणि अर्चना गौतम यांचा समावेश आहे. या 9 स्पर्धकांपैकी तीन स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये पोहोचतील आणि त्यापैकी एक जण बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा विजेता ठरणार आहे.

वोटिंगच्या आधारावर टॉप 9 स्पर्धक

15 व्या आठवड्याच्या रँकिंगनुसार, टॉप 5 मध्ये असे स्पर्धक समाविष्ट आहेत, ज्यांची फारच कमी अपेक्षा होती. टॉप 9 च्या यादीत सर्वांत शेवटी सौंदर्या शर्मा आहे, तर प्रियांका चहर चौधरी ही नंबर 1 ठरली आहे. शिव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर आणि एमसी स्टॅन तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर सुम्बुल तौकीर खान, पाचव्या क्रमांकावर अर्चना गौतम आहे. टीना दत्ता आणि निम्रत कौर आहलुवालिया हे अनुक्रमे सहा आणि सातव्या क्रमांकावर आहेत. तर शालीन भनोट आठव्या क्रमांकावर आहे.

हे सुद्धा वाचा

सुम्बुल तौकीर खानचा रेकॉर्ड

बिग बॉस 16 मध्ये सुम्बुल तौकीर खानने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. बिग बॉसच्या घरात 100 दिवस पूर्ण करणारी सर्वांत तरुण स्पर्धकचा किताब तिला मिळाला आहे. सुम्बुल 19 वर्षांची आहे आणि इतक्या कमी वयाचा कोणताही स्पर्धक आजपर्यंत बिग बॉसच्या घरात सर्वाधिक दिवस टिकू शकला नव्हता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI