AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडेच्या सासऱ्याने काढली तिच्या आईची लायकी? ‘तो’ वाद वाढलाच, थेट फोन करूनच…

अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झाले आहेत. मात्र, यादरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळाला. नुकताच काही आरोपही करण्यात आले आहेत.

अंकिता लोखंडेच्या सासऱ्याने काढली तिच्या आईची लायकी? 'तो' वाद वाढलाच, थेट फोन करूनच...
| Updated on: Jan 15, 2024 | 2:54 PM
Share

मुंबई : अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झाले आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे मोठे भांडणे बिग बाॅस 17 च्या घरात बघायला मिळाली. नुकताच बिग बाॅस 17 च्या घरात विकी जैन याची आई आणि अंकिता लोखंडे हिची सासू रंजना जैन या आल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी अंकिता लोखंडे हिची आई देखील बिग बाॅस 17 च्या घरात आली. बिग बाॅस 17 च्या घरात नुकताच फॅमिली वीक पार पडला. यावेळी विकी जैन याच्या आईकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला. ज्यानंतर सर्वचजण हे हैराण होताना दिसले.

अंकिता लोखंडे हिच्या सासूबाईकडून सांगण्यात आले की, ज्यावेळी तू विकीला लाथ मारली आणि चप्पल फेकून मारली त्यावेळी पप्पांनी (सासऱ्यांनी) तुझ्या आईला थेट फोन केला आणि विचारले की, तुम्ही देखील तुमच्या पतीसोबत असेच वागत होतात का? हे ऐकताच अंकिता लोखंडे हिचा पारा चढला आणि तिथेच सासूला थेट म्हटले की, माझ्या मम्मीला कशाला मध्ये आणले?

तुम्हाला जे काही बोलायचे ते मलाच बोला…अगोदरच काही दिवसांपूर्वीच माझे वडील वारले आहेत. आता नुकताच विकी जैन याने अंकिता लोखंडे हिला विचारले आहे की, नेमके तुझ्यामध्ये आणि मम्मीमध्ये काय बोलणे झाले? आता विकी जैन याला नेमके काय घडले हे सविस्तरपणे सांगताना अंकिता लोखंडे ही दिसत आहे.

अंकिता लोखंडे म्हणाली की, मी ज्यावेळी तुला चप्पल फेकून मारली, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यानंतर माझ्या आईला तुझ्या वडिलांनी फोन केला आणि विचारले की, तुम्ही देखील तुमच्या पतीसोबत असेच वागत होतात का? हेच नाही तर अजून बऱ्याच गोष्टी माझ्या आईला बोलल्या गेल्या आहेत.

असा दावा केला जातोय की, अंकिता लोखंडे पतीला म्हणाली की, त्यांनी माझ्या आईला तुमची लायकी काय आहे असेही म्हटले. मी आई (सासू) ला काहीच बोलले नाही. कारण मला या गोष्टींबद्दल टीव्हीवर बोलायचेच नव्हते. मी मम्मीला फक्त साॅरी साॅरीच म्हटले. आता असा दावा केला जातोय की, खरोखरच अंकिता लोखंडे हिच्या सासऱ्याने तिच्या आईच्या लायकीबद्दल बोलले आहे. मात्र, यावर अजूनही काही खुलासा हा करण्यात नाही आला.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.