‘असे घाणेरडे सेलिब्रिटी पाहिलेच नाही… ‘बिग बॉस’च्या घरात अक्षरश: कचऱ्याचं साम्राज्य; निर्मातेही संतापले

बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. नुकताच बिग बॉस 17 मध्ये विकेंडचा वार हा पार पडला. या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसला. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात यांच्यामध्ये मोठे भांडणे होताना दिसत आहेत.

'असे घाणेरडे सेलिब्रिटी पाहिलेच नाही... 'बिग बॉस'च्या घरात अक्षरश: कचऱ्याचं साम्राज्य; निर्मातेही संतापले
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 3:12 PM

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये आतापर्यंत मोठे भांडणे, वादविवाद आणि कुठेतरी प्रेम बघायला मिळतंय. फुटेज मिळवणाच्या चक्करमध्ये घरातील सदस्यांनी बिग बॉस 17 च्या घराची वाट लावल्याचे बघायला मिळतंय. यामुळेच आता बिग बॉस 17 चे निर्माते हे घरातील सदस्यांवर चांगलेच भडकल्याचे बघायला मिळतंय. सोशल मीडियावर एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये बिग बॉस हे घरातील सदस्यांना काही फोटो हे दाखवताना दिसत आहेत. बिग बॉस 17 च्या घरात मोठी घाण ही सदस्यांकडून करण्यात आलीये.

बिग बॉस 17 कडून किचन, बेडरूम, हाॅल, बाथरूम आणि इतर परिसरातील काही फोटो दाखवण्यात आले. या फोटोंमध्ये बिग बॉस 17 चे घर घाण केल्याचे स्पष्ट दिसतंय. किचनमध्ये खूप सारा कचरा दिसतोय. दुसरीकडे बेडरूममध्येही कपड्यांची घाण दिसत आहे. हेच फोटो बिग बॉस 17 च्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना दाखवण्यात आले.

हे फोटो पाहून बिग बॉस 17 च्या घरातील सदस्य हे बिग बॉसला साॅरी म्हणताना दिसत आहेत. मात्र, बिग बॉस 17 चे निर्माते हे याबद्दल घरातील सदस्यांना चांगलीच शिक्षा देण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, काही लोक हे बिग बॉस 17 च्या घरात मोठा बाॅक्स घेऊन दाखल झाले आहेत. यांच्या हातामध्ये साफसफाई करण्याचे साहित्य देखील दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

इतकेच नाही तर थेट बिग बॉस 17 च्या घरातील साहित्य देखील या लोकांकडून जप्त केले जातंय. घरातील काही सदस्य हे आपल्या वस्तू घेऊन जाताना दिसत आहेत. आपले साहित्य जप्त होण्यापासून वाचवण्यासाठी घरातील सदस्य धावपळ करताना दिसत आहेत. हा प्रोमोचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, बिग बॉस 17 च्या निर्मात्यांचे हे रूप पाहून घरातील सदस्य हैराण झाले आहेत.

बिग बॉस 17 च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये धमाका होणार हे नक्कीच दिसतंय. बिग बॉस आता घरातील सदस्यांना नेमकी काय शिक्षा देतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. नुकताच बिग बॉस 17 च्या घरात विकी जैन आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसले. हेच नाही तर थेट गंभीर आरोप करताना दोघेही दिसले. मुळात म्हणजे अंकिता लोखंडे हिला अभिषेक कुमार आवडत नाही.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.