Bigg Boss 17 : मी तुझा गुलाम नाही; अंकिता लोखंडेवर भडकला विकी जैन, पहा व्हिडीओ

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी विकी अंकितावर भडकला आणि तिला म्हणाला, "मी तुझा गुलाम नाही". भांडणाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Bigg Boss 17 : मी तुझा गुलाम नाही; अंकिता लोखंडेवर भडकला विकी जैन, पहा व्हिडीओ
Ankita Lokhande and Vicky JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 9:37 AM

मुंबई : 24 ऑक्टोबर 2023 | टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’मध्ये दररोज नवीन ड्रामा पहायला मिळत आहे. दररोज बिग बॉसच्या घरात नात्यांची परीक्षा घेतली जात आहे. एकाच घरात सतत 24 तास एकमेकांसमोर राहिल्यानंतर अनेकांच्या संयमाचाही बांध सुटतो. असंच काहीसं अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यासोबत होताना दिसतंय. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून ही जोडी विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर विकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो अंकितावर जोरदार भडकताना दिसतोय.

बिग बॉसच्या घरात एकमेकांशी गप्पा मारत असताना अंकिता विकीला म्हणते की, “तू गेम चांगला खेळतोय. पण गेममध्ये तू मला पाठिंबा देत नाहीस. यामुळे मला एकटेपणा जाणवतोय.” हे ऐकून विकीला राग येतो आणि तो तिच्यावर भडकून म्हणतो, “मी तुझा गुलाम नाही आणि मी माझ्या मर्जीनुसार खेळणार. आपण एक काम करुया. आपण एकमेकांशी बोलूच नकोया आणि लांब राहुयात.” विकीचं हे बोलणं ऐकून अंकिताच्या डोळ्यात पाणी येतं. यावेळी विकी त्यांच्या नात्यात आलेल्या कठीण काळाचीही अंकिताला आठवण करून देतो.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

आणखी एका व्हिडीओमध्ये विकी अंकितावर जोरजोरात ओरडून बोलताना दिसत आहे. या दोघांमधील भांडण हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘म्हणूनच लग्न झालेल्या जोडप्यांनी रिॲलिटी शोमध्ये एकत्र भाग घेऊ नये’, असं एकाने म्हटलंय. तर काहींनी विकीचा बचाव केला आहे. ‘तो बरोबर बोलतोय. तुम्ही संपूर्ण एपिसोड पाहिलात तर तुम्हाला समजेल की तो योग्यच आहे. प्रत्येक क्षणी तुम्ही सोबत नाही राहू शकत. असं असेल तर स्वत:च्या घरी राहा, बिग बॉसमध्ये नाही’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. काही नेटकऱ्यांनी अंकितावर ओव्हर ॲक्टिंगची टीका केली.

अंकिता आणि विकी यांनी डिसेंबर 2021 मध्ये मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. त्याआधी हे दोघं काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. या मालिकेतील सहकलाकार आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतलाही ती डेट करत होती. मात्र जवळपास पाच-सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.