AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी आजपर्यंत ज्या बायकांसोबत…’, ‘बिग बॉस 17’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकी याचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 17 winner Munawar Faruqui: 'शो जीत गए मगर इज्जत हार गए...', 'बिग बॉस 17' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकी याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, 'मी आजपर्यंत ज्या बायकांसोबत...', सर्वत्र मुनव्वर याच्या वक्तव्याची चर्चा...

'मी आजपर्यंत ज्या बायकांसोबत...',  'बिग बॉस 17' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकी याचं मोठं वक्तव्य
| Updated on: Jan 30, 2024 | 12:09 PM
Share

मुंबई | 30 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान याने ‘बिग बॉस 17’ चा विजेता म्हणून मुनव्वर फारुखी याच्या नावाची घोषणा केली. रविवारी रात्री मुनव्वर याचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. विजयी झाल्यानंतर मुनव्वर याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, मुनव्वर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे मुनव्वर याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता मुनव्वर याने स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

नुकताच झालेल्या मुलाखतीत मुनव्वर याने विजयी झाल्यानंतरच्या भावनांबद्दल देखील सांगितलं. ‘मी प्रत्येत गोष्ट सांगायला सुरुवात केली तर, इकडे सकाळ होईल… मी अभिषेक कुमार याच्याबद्दल सांगितलं तर, त्याचा प्रवास फार कठीण होता. त्याच्यासाठी मला प्रचंड वाईट वाटत आहे.’

पुढे मुनव्वर याला जिंकलेल्या रकमेचं काय करणार… असा प्रश्न विचारला. यावर मुनव्वर म्हणाला, ‘ट्रॉफी घेऊन डोंगरीला जायचं आहे… 50 लाख रुपयांबद्दल तर मी विसरुन गेलो होतो… जर तुम्हाला जिंकायचं असेल तर, प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्या… जेव्हा तुम्ही पळवाट काढता तेव्हा आणखी अडचणी येतात…’ असं देखील मुनव्वर म्हणाला.

मुनव्वर पुढे म्हणाला, ‘ज्यांनी मला जिंकवलं आहे, त्यांचे मी आभार मानतो… पुढचा प्रवास अधिक कठीण आहे. मला आणखी मेहनत करावी लागणार आहे. मी आजपर्यंत अनेक बायकांसोबत काम केलं आहे आणि त्यांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर फारुकी याची चर्चा रंगली आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर फारुकी याची चर्चा रंगली आहे. ‘लॉकअप’ त्यानंतर ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरल्यानंतर सर्वत्र मुनव्वर याची चर्चा रंगली आहे. मुनव्वर याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा झाल्यानंतर, ‘बिग बॉस 17’ ची ट्रॉफी मिळाली आहे. एवढंच नाही तर, मुनव्वर याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली असून मुनव्वर याला 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळालं आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.