
Bigg Boss 19 Grand Finale : ‘बिग बॉस 19’ शोचे टॉप 5 स्पर्धक समोर आले आहे. आता या शर्यतीत कोण बाजी मारतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे… अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ शो तुफान चर्चेत राहिला… रविवारी अखेर शोला त्याचा विजेता भेटणार आहे… त्यामुळे ‘बिग बॉस 19’ शोची ट्रॉफी कोणता स्पर्धक घरी घेऊन जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज ‘बिग बॉस 19’ शोची ट्रॉफी टॉप 5 स्पर्धकांपैकी एकाच्या डोक्यावर सजेल. तान्या मित्तल, अमाल मलिक, गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे…. हे टॉप 5 स्पर्धक आहेत.
जसजसा फिनाले जवळ येत आहे तसतसे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचत आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या आवडत्या स्पर्धक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. 106 दिवसांच्या प्रवासानंतर, स्पर्धक अखेर आज घरी परतू शकतील. तर जाणून घ्या कधी, कुठे आणि किती वाजता तुम्हाला शो पाहता येणार आहे.
बिग बॉस 19 च्या लेटेस्ट भागात टॉप 5 स्पर्धकांच्या प्रवासाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. या स्पर्धकांच्या प्रवासाचे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सांगायचं झालं तर, हा पहिला सिझन आहे, जेथे कळून येत नाही की, कोणता स्पर्धक विजेता ठरू शकतो… आज फायनली टॉप 5 स्पर्धकांपैकी कोणाला ट्रॉफी मिळेल हे सांगणं कठीण आहे…
7 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये, बिग बॉसचे स्पर्धक त्यांच्या डान्स परफॉर्मेंसने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील. चाहते रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर ग्रँड फिनाले पाहू शकतात. ओटीटी नंतर, “बिग बॉस 19” चा ग्रँड फिनाले रात्री 10.30 वाजता कलर्सवर प्रसारित होईल. त्यात कोणता स्पर्धक शेवटी चमकदार “बिग बॉस 19” ट्रॉफी जिंकेल हे उघड होईल.
‘बिग बॉस 19’ च्या आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन वोट करु शकता… ‘बिग बॉस 19’ शोधा आणि ‘वोट नाऊ’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर टॉप 5 स्पर्धकांचे फोटो दिसतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करू शकाल.