AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसमधील स्पर्धक छोटा पुढारी कोणाबाबत म्हणाला वाकडे तिकडे चाळे….

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या स्पर्धत म्हणून खेळत असलेला घनश्याम दरोडे म्हणजेच सगळ्यांचा लाडका छोटा पुढारी सध्या चर्चेत आहे. त्याने त्याच्या बोलण्याच्या शैलीने अनेकांचं मन जिंकलं होतं. पण त्याने गौतमी पाटीलवर बोलताना एक गंभीर वक्तव्य केलेय. काय म्हणाला तो जाणून घ्या.

बिग बॉसमधील स्पर्धक छोटा पुढारी कोणाबाबत म्हणाला वाकडे तिकडे चाळे....
| Updated on: Aug 12, 2024 | 4:40 PM
Share

छोटा पुढारी सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आला आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीजनमध्ये घनश्याम दरोडे हा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी यांने आपल्या शैलीने सगळ्यांचं ध्यान आकर्षित केले आहे. घनश्याम दरोडे याने काही दिवसाआधी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलवर टीका केली होती. गौतमी पाटील आणि छोटा पुढारी यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळाले होते. छोटा पुढाली आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भूमिका मांडताना चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे. पण त्याआधी काही दिवसांपूर्वी त्याने गौतमी पाटीलवर केलेल्या टीकेमुळे चर्चा मिळवली होती. गौतमी पाटीलबाबत बोलताना तो म्हणाला होता की, महाराष्ट्राचा बिहार करू नको. वाकडे तिकडे चाळे करून अश्लीलता दाखवल्याचा आरोप देखील छोटा पुढारी याने केला होता. त्यावर गौतमी पाटीलने देखील त्याला उत्तर दिले होते.

गौतमी पाटील काय म्हणाली होती

गौतमी पाटील म्हणाली की, “तो काय बोलला मला माहीत नाही. मी त्याचा व्हिडीओ पाहिला नाही. तो कोण आहे मला माहिती नाही. मी महाराष्ट्राची संस्कृती जपतेय. सर्व गोष्टी सोडून मी पुढे जात आहे. तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच का दिसते असा प्रश्न ही तिने केला होता. इतरांकडेही लक्ष द्या. मी महाराष्ट्राचा बिहार काय केला. मला त्याचं आधी उत्तर द्या. मी काय चुकली आहे ते मला सांगा. त्यानंतर पुढे बोला.

बिग बॉसच्या घरात करतोय धमाल

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलने राज्यात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. अनेक कार्यक्रमांना लोकं गौतमी पाटीलला बोलवत आहेत. पण महाराष्ट्राचा छोटा पुढारी देखील महाराष्ट्रात चर्चत राहणारा व्यक्ती आहे. त्याने आपल्या बोलण्याच्या स्टाईलने लोकांचं मन जिंकले आहे. छोटा पुढाली आता बिग बॉसच्या घरात मस्ती करताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या खेळात त्याने घेतलेल्या भूमिका देखील चर्चेत आल्या आहेत. छोटा पुढारी हा थेट बोलण्यासाठी ओळखला जातो.

Follow Us
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा.
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा.
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.