AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे असं कोण बघणार? ‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजवर संतापली अभिनेत्री; प्रेक्षकही निराश

अभिनेत्रीने 'धुरंधर 2'च्या ओटीटी रिलीजवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 5 जून रोजी हा चित्रपट जियो हॉटस्टारवर स्ट्रीम झाला. मात्र ओटीटीवर हा चित्रपट पाहताना अनेक अडचणी समोर येत आहेत. यावरून तिने पोस्ट लिहिली आहे.

हे असं कोण बघणार? 'धुरंधर 2'च्या ओटीटी रिलीजवर संतापली अभिनेत्री; प्रेक्षकही निराश
Dhurandhar 2 on OTTImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2026 | 12:04 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार, याची प्रतीक्षा जगभरातील प्रेक्षकांना होती. अखेर जूनच्या पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट जियो हॉटस्टारवर स्ट्रीम झाला. ‘धुरंधर’चा पहिला भाग जरी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला असला तरी दुसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मची निवड केली. मात्र यावर हा चित्रपट बघण्याचा अनुभव त्रासदायक असल्याची तक्रार अनेकांनी केली. रणवीरचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट ओटीटीवर पाहताना अनेक अडचणी आल्याने प्रेक्षक निराश झाले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री बंदगी कालरा हिनेसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला.

रणवीर सिंहचा हा चित्रपट 5 जूनपासून जियो हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने बंदगी कालरानेही हा चित्रपट पाहण्याचा विचार केला. मात्र चित्रपट पाहताना वारंवार येणाऱ्या जाहिरातींमुळे ती वैतागली. त्यामुळे हा चित्रपट जियो हॉटस्टारऐवजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करायला हवा होता, असं मत तिने मांडलं आहे.

बंदगीने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘धुरंधर : द रिव्हेंज हा चित्रपट या फालतू जियो हॉटस्टारवर नाही तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करायला हवा होता, अशी माझी इच्छा आहे. 100 जाहिराती आणि खराब ऑडिओ असलेला हा चित्रपट कोण पाहू इच्छितो? या जाहिराती इतक्या लांब आहेत की तुम्ही कोणता चित्रपट किंवा दृश्य पाहत होता, हेच विसरून जाता. नेटफ्लिक्स कृपया हा चित्रपट प्रदर्शित करा.’

बंदगीची पोस्ट-

बंदगीने या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचं मात्र कौतुक केलं. ‘रामलीला या चित्रपटात रणवीरला पाहिल्यापासून मी त्याची सर्वांत मोठी चाहती झाली आहे. तो असा एकमेव अभिनेता आहे, ज्याने इतक्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अत्यंत प्रामाणिकपणाने आणि सर्जनशीलतेनं त्याने ही भूमिका साकारली आहे. मी नेहमीच त्याची नंबर वन चाहती राहीन’, असं तिने पुढे लिहिलं आहे.

बंदगीची पोस्ट व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘कमी शुल्कामुळे काही लोक जाहिरात असलेलं सबस्क्रिप्शन घेतात. म्हणून असं होतं’, असं एकाने निदर्शनास आणून दिलं. तर चित्रपटादरम्यान येणाऱ्या असंख्य जाहिराती या लक्ष विचलित करणाऱ्या आणि मनोरंजनाचा अनुभव बिघडवणाऱ्या आहेत, असा युक्तिवाद इतरांनी केला.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप