AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 जणांसोबत होते तिचे संबंध, आता वयाच्या 62 व्या वर्षी या बॉलिवूड अभिनेत्रीला पुन्हा नवरी बनण्याचे वेध

Actress Love Life: बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीचे होते 6 सेलिब्रिटी पुरुषांसोबत प्रेमसंबंध... आता वयाच्या 62 व्या वर्षी अभिनेत्रीला पुन्हा व्हायचंय नवरी... स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल म्हणाली...

6 जणांसोबत होते तिचे संबंध, आता वयाच्या 62 व्या वर्षी या बॉलिवूड अभिनेत्रीला पुन्हा नवरी बनण्याचे वेध
| Updated on: Mar 21, 2026 | 1:21 PM
Share

Actress Love Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न करण्यापूर्वी अनेक पुरुषांना डेट केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रींनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर, काही अभिनेत्रींनी दुसऱ्या लग्नाचा विचार देखील केला नाही. पण काही अभिनेत्रींनी मात्र दुसरा संसार थाटला. पण दुसऱ्या लग्नात देखील त्यांनी यश मिळालं नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री कुनिका कपूर… कुनिका आज फक्त एक अभिनेत्री नाही तर, वकील देखील आहे… ‘बिग बॉस 19’ मध्ये स्पर्धक म्हणून झळकल्यानंतर कुनिका पुन्हा चर्चेत आली.

कुनिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक कुमार सानू सोबत असलेल्या नात्याबद्दल देखील आज सर्वांना माहिती आहे. अशात दोन घटस्फोटांनंतर देखील कुनिका वयाच्या 62 व्या वर्षी प्रेमाच्या शोधात आहे… कुनिका सदानंदने बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या नात्याबद्दल चर्चा केली आहे. पुन्हा एकदा, तिने तिच्या नात्याबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कुनिका म्हणाली, ‘2 लिव्ह इन रिलेशनशिप… 2 लग्न आणि 2 शॉर्ट टाईम रिलेशनशिपमध्ये मी होते… आपल्या समाजाने हे अधिकार फक्त आणि फक्त पुरुषांना असं करण्याची संधी देतो… महिलांना देखील असं करायला हवं.. मी आज देखील प्रेमासाठी तयार आहे, मला फक्त एक कमिंटमेंट हवी आहे…’, आजही जेव्हा कुनिका हिला चांगला पर्टनर भेटेल तेव्हा अभिनेत्री लग्न करेल…

कुमार सानू यांच्यासोबत रिलेशनशिप…

कुनिका सदानंद आणि गायक कुमार सानू रिलेशनशिपमध्ये होते. कुनिका अनेक वर्षे कुमार सानूसोबत राहिलीसुद्धा होती. बिग बॉसमध्ये कुनिकाने खुलासा केला की, ती एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात होती, पण तिच्यासोबत विश्वासघात झाला.

लिव्हइन रिलेशनशिप आधी कुनिका हिने दोन लग्न केली होती. पण अभिनेत्रीचे दोन्ही लग्न फार काळ काही टिकले नाहीत. पहिल्या लग्नापासून अभिनेत्री एक आणि दुसऱ्या लग्नापासून एक… अशी दोन मुले आहेत. पहिल्या मुलाचं नाव अरिहंत कोठारी आणि दुसऱ्या मुलाचं नाव अयान लाल असं आहे…

कुनिका हिने सांगितल्यानुसार, दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी अभिनेत्रीला फार मोठा संघर्ष करावा लागला आहे. सिंगल मदर असल्यामुळे, तिला मुलांना वाढवताना अडचणींचा सामना करावा लागला, पण तिने प्रत्येक अडचणीवर मात केली.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.